Govinda: रूमर्ड गर्लफ्रेंड कोमल राणीसोबत गोविंदा लालबागच्या राजाच्या चरणी; Video व्हायरल

Govinda: गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकर यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे काही तास आधी सुनीता आहुजाही तिथे पोहोचल्या होत्या. या भेटीची सध्या चर्चा सुरू आहे.
Govinda
GovindaSaam Tv
Published On

Govinda: मुंबईतील गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना बॉलिवूड अभिनेता गोविंदा मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला. मात्र, यावेळी गोविंदाच्या दर्शनापेक्षा त्याच्यासोबत दिसलेली अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकर अधिक चर्चेत आली. दोघांनी एकत्र गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आरतीतही सहभाग घेतला. गोविंदाच्या या भेटीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गोविंदाने दर्शनासाठी पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. तर कोमल राणी लाल रंगाच्या साडीत आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये दिसली. दर्शनानंतर दोघांनी पापाराझींकडे पाहून हात दाखवून ग्रिट केले. पण यावेळी गोविंदा येण्याच्या काही वेळ आधी सुनीता अहुजा एकट्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला आल्यामुळे हे प्रकरण आणखी रंगले.

Govinda
Shivali Parab Look: शिवाली परबचा किलर वेस्टर्न लूक; व्हाइट-ब्राउन आउटफिटमधला ग्लॅमरस अंदाज

सुनीता आहुजा यांनीही घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

विशेष म्हणजे, गोविंदा आणि कोमल राणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचण्याच्या काही तास आधी गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा याच मंडपात दर्शनासाठी आली होती. त्यांनी बाप्पाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. त्यामुळे एकाच दिवशी गोविंदा आणि सुनीता वेगवेगळ्या वेळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला आल्यामुळे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

Govinda
National Awards: मराठी सिनेमाची उंच भरारी! दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'या' सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

गोविंदा आणि सुनीता यांच्या वैवाहिक नात्याबाबत मागील काही काळापासून विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, ऑगस्ट २०२६ मध्ये सुनीता आहुजा यांनी गोविंदाविरोधातील घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याची माहिती गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिली होती. त्यांनी दोघे वेगळे होणार नसल्याचेही सांगितले होते.

दरम्यान, गोविंदा नुकताच अमेरिकेतून मुंबईत परतला असून त्याने मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन यांच्यासोबत गणेशोत्सव साजरा केला होता. मात्र, त्या प्रसंगी सुनीता आहुजा दिसल्या नव्हत्या. आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गोविंदा आणि कोमल एकत्र आल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com