National Awards: मराठी सिनेमाची उंच भरारी! दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'या' सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

National Film Awards: 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीचा डंका वाजला. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ आणि ‘घरत गणपती’सह अभय जोधपूरकर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
National Film Awards
National Film AwardsSaam Tv
Published On

National Film Awards: 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मंगळवारी, 22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील एकता नगर, केवडिया येथे पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2024 सालातील भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकार आणि चित्रपटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचा सोहळा दिल्लीबाहेर आयोजित करण्यात आला.

या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीने विशेष छाप पाडली. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान मिळाला. चित्रपटाचे निर्माते भरत शितोळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘रजत कमळ’ पुरस्कार स्वीकारला. परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटात प्रशांत दामले, वैभव मांगले, आनंद इंगळे, अद्वैत दादरकर, प्रणव रावराणे, रितिका श्रोत्री, मनमीत पेम आणि गीतांजली कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत.

National Film Awards
Shivali Parab Look: शिवाली परबचा किलर वेस्टर्न लूक; व्हाइट-ब्राउन आउटफिटमधला ग्लॅमरस अंदाज

मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे ‘घरत गणपती’ चित्रपटातील ‘नवसाची गौरी माझी’ या गाण्याला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार. या गाण्यासाठी गायक अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना ‘रजत कमळ’ आणि रोख पुरस्काराने गौरवण्यात आले.

दरम्यान, यंदाच्या पुरस्कारांमध्ये ‘आर्टिकल 370’ने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार पटकावला. या चित्रपटातील अभिनयासाठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर ‘ब्रम्हयुगम’साठी ममूटी आणि ‘चंदू चॅम्पियन’साठी कार्तिक आर्यन यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान मिळाला.

National Film Awards
Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

‘अमरन’ चित्रपटासाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ‘भक्षक’साठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘महाराजा’मधील सचाना नमिदास आणि ‘मिथ्या’मधील रोपाश्री वरकाडी यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

दिग्दर्शक म्हणून पदार्पणासाठी रणदीप हुड्डा यांना ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’साठी पुरस्कार मिळाला. तर ‘कल्कि 2898 एडी’ला सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कारही प्रदान करण्यात आला. त्यामुळे 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा भारतीय तसेच मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com