Bhaata Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलगडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Bhaata Marathi Movie: बेलदार समाजाचा संघर्ष, बाप-लेकीचं भावनिक नातं आणि शिक्षणासाठीची झुंज दाखवणारा 'भाटा' हा मराठी चित्रपट २८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Bhaata Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक आशयाला स्पर्श करणाऱ्या चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अशाच एका वेगळ्या विषयावर आधारित 'भाटा' हा चित्रपट येत्या २८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. बेलदार या भटक्या समाजाच्या संघर्षमय जीवनावर आणि वडील-मुलीच्या भावनिक नात्यावर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसमोर एक हृदयस्पर्शी कथा घेऊन येणार आहे.

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, लातूर) यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले. पोस्टर लाँचनंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

व्ही. डी. एंटरटेनमेंट आणि मोरया उद्योग समूह प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अरायव्हल स्टुडिओ प्रा. लि. यांनी केली आहे. सुनील आबा जाधव आणि विजय चंद्रकांत चव्हाण हे चित्रपटाचे निर्माते असून रिजवान शेख, नितेश पराडकर आणि सुनील कातकर यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन भरतराज नारायण यादव यांनी केले असून सहदिग्दर्शन अक्षय सुतार यांचे आहे.

चित्रपटाची कथा विजय चंद्रकांत चव्हाण यांनी लिहिली असून पटकथा आणि संवाद शरद कारंडे यांचे आहेत. गीते आणि संगीताची जबाबदारी श्रेयस आंगणे यांनी सांभाळली आहे, तर छायाचित्रण हरेश सावंत यांचे आहे. 'भाटा'मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय कदम, अनिल नगरकर, लक्ष्मण देवभट, प्रशांत मोहिते, रुपाली जाधव, प्रेमा किरण आणि बालकलाकार तनिष्का जाधव यांच्या भूमिका चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहेत.

चित्रपटाची कथा बेलदार समाजातील राणा या व्यक्तीभोवती फिरते. दगड फोडून उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजातील लोकांचे आयुष्य संघर्षमय असते. मात्र, राणा आपल्या मुलीला चांगले शिक्षण देऊन मोठे करण्याचे स्वप्न पाहतो. गरिबी, सामाजिक अडथळे आणि कठीण परिस्थितीशी झुंज देत तो आपल्या स्वप्नासाठी लढत राहतो. समाज त्याच्या स्वप्नांना साथ देईल की त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करेल, याचे उत्तर 'भाटा' या चित्रपटातून मिळणार आहे.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT