Vaghacha Doggy song Saam TV
मनोरंजन बातम्या

Vaghacha Doggy Song: लग्नानंतर वाघासारख्या नवऱ्याचं मांजर नाही तर 'वाघाचा डॉगी' होतो; बाई गं चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Vaghacha Doggy Song Released From Bai Ga Movie: सध्या सोशल मीडियावर बाई गं चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'वाघाचा डॉगी' असं या गाण्याचं नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अपूर्वा कुलकर्णी, साम टीव्ही

लग्न झाल्यानंतर वाघासारख्या नवऱ्याचं मांजर होतं असं ऐकलेलं. परंतु बाई गं चित्रपटात साडेसाती मागे लागलेल्या नवऱ्याच्या मागे 'वाघाचा डॉगी' बनायची वेळ आलीय. परदेशातील मुलींच्या सोबतीनं 'वाघाचा डॉगी' हे गाणं आणखीनच खुलून आलाय. स्वप्निल जोशीसोबत परदेशी मुली या गाण्यावर थिरकताना दिसताय.

प्रत्येक जोडप्याची प्रेम काहाणी खास असते. प्रत्येक प्रेमकाहाणीत बायको रुसलेली तर नवरा तिला मनवणारा असतो.. बायकोची समजुत काढता-काढता नवऱ्याला नाकेनऊ येते. याचाच प्रत्येय या "वाघाचा डॉगी" गाण्यातून दाखवण्यात आलाय.. हे गाणं जय अत्रे यांनी लिहलं असून नकाश अझीझ आणि वृषा दत्ता यांनी हे गाणं गायलय.. या सोबतच या गाण्याला इंग्लिश लिरिक्स सुद्धा देण्यात आलय.

स्वप्निल जोशी मुख्य भूमिकेत असलेल्या 'बाई ग' चित्रपटात त्याच्या सोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, अदिती सारंगधर, नेहा खान, दीप्ती देवी यांनी काम केलय. मागच्या 5 जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा स्वप्नील जोशी कसा पूर्ण करतो. हे या 'बाई ग' चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलय.

मागच्या जन्मातील बायकांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करताना त्याला येणारी नाकेनऊ ही विनोदी आणि रंजक पद्धतीनं मांडण्यात आलीय.. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव यांनी केलय.तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. त्यामुळे 'स्वप्निल" आता मागच्या 5 जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा कसा पूर्ण करतो हे येत्या 12 जुलैला 'बाई गं' हा चित्रपट पाहिल्यानंतर समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झाली तर काय खावं?

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

इंडिया आघाडीचा EVM हटावचा नारा, इंडिया आघाडीला हवी बॅलटवर निवडणूक

World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

ठाण्याच्या लेडी डॉनला वाचवतंय कोण? ठाणे बीडपेक्षा वाईट, राऊतांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT