ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पनीर 65 हा एक चटपटीत पदार्थ आहे. जे लहानापासून ते मोठ्यांना असे सर्वांना खायला आवडतो.
एका भांड्यात गरजेनुसार कॉर्न फ्लोअर आणि तांदळाचे पीठ घेऊन ते एकत्रित करुन त्यात हळद, लाल मिरची आणि गरम मसाला ,धनेपूड एकत्रित करा.
सोबतच आले-लसून पेस्ट, २ चमचे दही आणि लिंबाचा रस शिवाय चवीनुसार मीठ घाला. यात दीड कप पाणी टाकून मिश्रण एकत्रिक करा.
तयार झालेल्या मिश्रणात पनीरचे तुकडे करुन त्यांना व्यवस्थित कोट करुन तेलात ते तुकडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
तळलेले तुकडे टिश्यू पेपरवर काढून त्यामधील अतिरिक्त तेल काढून घ्या.
त्यानंतर एका पॅनवर तेल गरम करुन त्यात जिरे, सुकी लाल मिरची तसेच लसूण ,आले शिवाय त्यात चिली सॉस आणि मीठ घाला.
त्यानंतर वरील मिश्रणात २ चमचे पाणी आणि दही मिक्स करा. ५ मिनिटांनंतर ठेवून गॅस बंद करुन टाका.
तयार झालेले मिश्रण तयार झाल्यावर ते तळलेल्या पनीरच्या तुकड्यांवर टाका. असे तयार झाले पनीर 65