Ramya Krishnan on her past relationship  Instagram
मनोरंजन बातम्या

Ramya Krishnan On Her Past Relationship: विवाहित पुरुषासोबत अफेअर आणि बरंच काही...; बाहुबलीतील 'शिवगामी'ने शेवटी सत्य आणि तथ्य काय ते सगळंच सांगितलं

Bahubali Fame Actress Ramya Krishnan : राम्याचे करिअरच्या सुरवातीला विवाहीत पुरुषासोबत अफेअर होते. त्यानंतर गरोदर आणि अबॉर्शन या सर्व गोष्टींमुळे राम्या पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bahubali Fame Actress Talks About Her Pregnancy And Abortion : ‘बाहुबली’मधील शिवगामी तुम्हाला सर्वांनाच आठवत असेल. चित्रपटात राम्या कृष्णनने शिवगामीचे पात्र साकारले. भूमिका साकारलेली अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. राम्याचे करिअरच्या सुरवातीला विवाहीत पुरुषासोबत अफेअर होते. त्यानंतर गरोदर आणि अबॉर्शन या सर्व गोष्टींमुळे राम्या पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. नुकतंच अभिनेत्रीने हे सर्व गोष्टांवर एका मुलाखतीत भाष्य केलं.

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. नुकतंच राम्या कृष्णनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एका मोठा खुलासा झाला आहे. दिग्दर्शक रवीकुमार यांनी राम्याला २००२ साली प्रदर्शित झालेल्या 'पंचतंत्र' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. याच काळात दिग्दर्शक रवीकुमार आणि राम्या कृष्णन यांच्यातील प्रेम बहरलं होतं. राम्या आणि रवीकुमार यांच्या नात्याची चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत होत होती.

त्यांच्या प्रेमाबद्दल रवीकुमार यांच्या पत्नीलादेखील कळले. त्यानंतर तिने राम्या यांना चांगलंच सुनावलेही होते. राम्या आणि रवीकुमार यांनी जवळपास २ वर्ष एकमेकांना डेट केले. याच काळात राम्या गरोदर असल्याच्याही चर्चा होत्या. राम्या यांनी अबॉर्शन केल्याच्याही चर्चांना उधाण आले होते. दरम्यान राम्या यांनी अबॉर्शनसाठी तब्बल ७५ लाख रुपयांची मागणी केल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. (Latest Entertainment News In Marathi)

बाहुबली फेम अभिनेत्री राम्याने या सर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे. राम्या यांनी एका मुलाखतीत त्यांना भूतकाळातील गोष्टींबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या अबॉर्शन झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

राम्याने १२ जून २००३ साली निर्माते कृष्णा वामसी यांच्याशी लग्नगाठ बांधली.लग्नानंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचे नाव रित्विक कृष्णा असे आहे.

राम्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर,राम्या 'बाहुबली' या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाली. राम्या सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. राम्याचा 'जेलर' आणि 'गुंटूर काराम' हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : दैव बलवत्तर! पिकअपची जोरदार धडक, स्कूल बसमध्ये आरपार घुसल्या लोखंडी सळ्या

Farmer : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; शिवसैनिक उतरले रस्त्यावर, धुळ्यासह नांदेड, बुलढाण्यात आंदोलन

Indian Air Force Day: 'फायटर' पासून 'स्काय फोर्स' पर्यंत, भारतीय हवाई दलाच्या शौर्य दाखवतात 'हे' चित्रपट

Property In Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळाजवळ बजेटमधील घरं कुठे मिळतील, अंदाजे किंमती किती? वाचा सविस्तर

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?

SCROLL FOR NEXT