Babil Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Babil Khan: बाबिल खानला वडील इरफान खान यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची भिती; म्हणाला, 'हा सन्मान आहे पण…'

Babil Khan: दिवंगत अभिनेते इरफान खान यांचे चाहते संपूर्ण जगभर पसरले आहेत. त्यांच्या निधनानंतर अनेकदा त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवण्याची चर्चा झाली आहे. अलीकडेच बाबिल खानने याबाबत एक वक्तव्य केल आहे.

Shruti Vilas Kadam

Babil Khan: दिवंगत अभिनेते इरफान खान यांचे चाहते संपूर्ण जगभर पसरले आहेत. त्यांच्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण झाले होते. त्यांच्या निधनानंतर अनेकदा त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवण्याची चर्चा झाली आहे. अलीकडेच इरफान खान यांचा मुलगा, बाबिल खानने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला की वडिलांच्या बायोपिकमध्ये काम करणे त्यांच्यासाठी "भीतीदायक" आणि "गौरवास्पद" देखील आहे.

बाबिल म्हणाला की, "वडिलांसारख्या महान कलाकाराची भूमिका साकारणे ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीत, डायलॉग डिलिव्हरी आणि अभिनयशैलीत असलेल्या सच्चेपणाला न्याय देणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे ही भूमिका स्वीकारण्याची कल्पनाच खूप घाबरवणारी आहे." बाबिलने हेही नमूद केले की तो अद्याप या कल्पनेवर विचार करत आहे आणि त्याला वाटते की अशी जबाबदारी स्वीकारण्यासाठी खूप मानसिक तयारी लागते.

बाबिल खानने आपल्या करिअरची सुरुवात 'कला' या चित्रपटाद्वारे केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची सगळीकडेच झाली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या आणि चित्रपटसृष्टीतील लोकांच्या मनात उत्सुकता आहे की बाबिल आपल्या वडिलांच्या आयुष्यावर आधारित कथेला योग्य न्याय देऊ शकेल का. बाबिल म्हणतो, "जर मी ही संधी स्वीकारली, तर ती केवळ एक भूमिका नसेल, तर वडिलांसाठी श्रद्धांजली असेल."

इरफान खान यांच्या बायोपिकची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी बाबिलच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. बाबिलने आपल्या वडिलांच्या शिकवणीवर आधारित आपले अभिनय कौशल्य घडवले आहे आणि त्याच्या शांत स्वभावामुळे तो वडिलांची व्यक्तिरेखा जिवंत करू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT