Zeenat Aman: ७३ वर्षीय झीनत अमान यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात अॅडमिट, फोटो पोस्ट करत म्हणाल्या...

zeenat aman hospitalize: ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याची माहिती शेअर केली आहे.
Zeenat Aman
Zeenat AmanSaam Tv
Published On

zeenat aman hospitalize: ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याची माहिती शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या सोशल मीडियावर सक्रिय नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली होती. मात्र, आता त्यांनी स्वतःच त्यांच्या प्रकृतीबाबत खुलासा करत चाहत्यांना माहिती दिली आहे.

झीनत अमान यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले केले की, गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळेच त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, त्यांची प्रकृती आता सुधारत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या विश्रांती घेत आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांचे आणि प्रियजनांचे आभार मानले आहेत, ज्यांनी त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Zeenat Aman
अक्षय कुमारच्या Kesari 2 वर चोरीचा आरोप, थेट पुराव्याचा व्हिडिओ टाकत केली पोलखोल

या पोस्टमध्ये झीनत अमान यांनी सोशल मीडियावरून दूर राहण्याचे कारणही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, सध्या त्या त्यांच्या आरोग्यावर लक्ष द्यायचे आहे आणि त्यामुळेच त्यांनी सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेतला. त्यांना चाहत्यांसोबत संवाद साधण्याची इच्छा आहे, पण त्यासाठी काही वेळ लागेल. त्यांच्या या पोस्टनंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट्सद्वारे त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Zeenat Aman
A.R Rahman: एआर रहमानला मोठा धक्का, कोर्टाने ठोठावला २ कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

७० आणि ८०च्या दशकातील बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या झीनत अमान यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. वयाच्या ७०व्या वर्षीही त्या त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्कात असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com