Sathyaraj Mother Passed Away Instagram
मनोरंजन बातम्या

Sathyaraj Mother Dies: ‘बाहुबली’ फेम कटप्पाला मातृशोक, कमल हसनसह टॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली...

Sathyaraj Mother Death: ‘बाहुबली’चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या कटप्पा फेम सत्यराजवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Chetan Bodke

Sathyaraj Mother Passed Away: तेलुगू सिनेसृष्टीतून एकद दु:खद बातमी येत आहे. ‘बाहुबली’चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या कटप्पा फेम सत्यराजवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या आईचं ११ ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. त्यांच्या मातोश्रीने वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्याच्या आईवर त्यांच्या मुळगावी कोईम्बतूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेते सत्यराज एका चित्रपटाच्या शूटिंग निमित्त हैदराबादमध्ये व्यग्र होते. आईच्या निधनाची बातमी कळताच त्यांनी शुटिंग थांबवली.

अभिनेत्याच्या आईबद्दल सांगायचे तर, सत्यराज यांच्या आईचे नाव नाथम्बल होते. सत्यराज, त्यांच्या दोन बहिणी आणि त्यांच्या आई असा त्यांचा परिवार होता. अभिनेता सत्यराज व्यतिरिक्त कल्पना आणि रूपा अशा त्यांच्या दोन बहिणी होत्या. सत्यराज हे आईच्या खूप जवळचे होते. सत्यराज यांच्या आईला सत्यराज यांना नेहमीच चित्रपटात पहायला आवडायचे. सत्यराज यांच्या आईला सत्यराज यांची ‘बाहुबली’ही मालिका खूपच आवडली होती.

सत्यराज यांच्या मातोश्रीच्या निधनाची माहिती कळताच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत शोक व्यक्त केलाय. त्या सेलिब्रिटींमध्ये, कमल हसन, उदयनिधी स्टॅलिन यांनी सत्यराज यांच्या आईच्या निधनावर ट्वीटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला.

कमल हसन ट्वीट करत म्हणतात, “मित्र सत्यराज यांच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दु:ख झाले आहे, त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहे.”

सत्यराजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘विलाधी व्हिलन’ या चित्रपटातून सत्यराजने दिग्दर्शन क्षेत्राच प्रवेश केला होता. गायक म्हणून देखील सत्यराज यांची टॉलिवूडमध्ये प्रसिद्धी आहे. ‘बाहुबली’ मधल्या कटप्पाच्या भूमिकेसाठी सत्यराजला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. सत्यराजने आपल्या फिल्मी करियरमध्ये आतापर्यंत तब्बल २४० चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान, अभिनेत्याने आपल्या फिल्मी कारकिर्दित खलनायकाच्या भूमिकेपासून करिअरची सुरुवात केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT