Athiya- Rahul Wedding Instagram
मनोरंजन बातम्या

Athiya- K.L.Rahul Wedding: 'राहुल माझा जावई नाही तर...' सुनील शेट्टी राहुलबद्दल जरा स्पष्टच बोलला...

यावेळी माध्यमांसोबत बोलताना सुनिल शेट्टीचे एक वक्तव्य सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Athiya- K.L.Rahul Wedding: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहुलचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झालं. लग्नानंतर हे कपल मीडियासमोर येण्याआधी बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी आणि अथियाचा भाऊ अभिनेता अहान शेट्टी माध्यमांसमोर आले होते. सुनील शेट्टी यावेळी खूपच आनंदीत दिसला आणि नंतर त्याने माध्यमांसोबत संवादही साधला. यावेळी माध्यमांसोबत बोलताना सुनिल शेट्टीचे एक वक्तव्य सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

सुनिल शेट्टी म्हणतो, "आता माझा रोल काही तसा नवीन नसेल. वडीलांचाच रोल असेल. राहुल माझा दुसरा मुलगाच आहे. हो पण आता अधिकृतरित्या सासरा बनलोय." हे बोलताना सुनिल शेट्टी खूप खूश दिसला. यावेळी त्यानं हात जोडून माध्यमांचे आभार मानले.

अथिया शेट्टी- के.एल. राहुलचं लग्न लागल्यानंतर सुनिल शेट्टीसोबत काही लोकही नजरेस पडले. त्यावेळी सगळ्यांच्या हातात मिठाईचे मोठे बॉक्स होते. सुनिलने मुलगा अहानसोबत मीडियाला त्याच्या हातांनी मिठाईच्या बॉक्सचे वाटप केले.

लग्नात सुनिल शेट्टीने लुंगी आणि कुर्ता परिधान केला होता. सोबतच त्याच्या माळेनी आणि कोल्हापुरी चप्पलने सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या कपाळावर मोठा टीळा होता. तर अहाननं व्हाइट कलरची शेरवानी घातली होती. अथिया आणि के.एल.राहुलचं लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात झाले. ज्यामध्ये बॉलिवूडपासून क्रिकेट जगतातील अनेक बड्या लोकांनी हजेरी राहिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

SCROLL FOR NEXT