Ata Thambaycha Naay Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ata Thambaycha Naay : खास महिला दिनानिमित्त; प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित 'आता थांबायचं नाय!' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

Ata Thambaycha Naay Marathi Movie : खास महिला दिनाच्या निमित्ताने झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ 'आता थांबायचं नाय' या दमदार सिनेमाचा दर्जेदार टीजर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत.

Shruti Vilas Kadam

Ata Thambaycha Naay Marathi Movie : मराठी सिनेमे नेहमीच त्याच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी वाखाणले जातात. त्यातच गेल्या काही वर्षात महिलाप्रधान सिनेमांकडे मनोरंजनसृष्टीचं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलंय. या ८ मार्च रोजी,खास महिला दिनाच्या निमित्ताने झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ घेऊन आले आहेत 'आता थांबायचं नाय' या दमदार सिनेमाचा दर्जेदार टीजर! महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण ह्या गोष्टींना प्रोत्साहन देत तसेच सामान्य माणसाच्या दैनंदिन कष्टाळू जीवनावर आधारित हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जबाबदारीच्या काटेरी कुंपणात अडकलेली, स्वतः पेक्षा जास्त कुटुंबाला महत्व देणारी, प्रत्येक क्षेत्रात स्वतःच अस्तित्व शोधणारी,अहिंसेचं प्रतीक असलेली प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे 'स्त्री' ! टिझर पाहता 'आता थांबायचं नाय!' हा चित्रपट प्रेरणा आणि मनोरंजन याचं उत्तम मिश्रण आहे असं समजतं आणि महत्वाची बाब म्हणजे हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे.

शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, रुपा बोरगांवकर आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया निर्माते आहेत.

इतकच नव्हे तर सर्वांची आवडती ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी ह्यांची खास झलक या टिझरमध्ये पहायला मिळते त्या सुद्धा एका विशेष भूमिकेत या सिनेमामध्ये दिसणार आहेत. एका कणखर आणि स्वतंत्र महिलेची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता प्राजक्ता हनमघरने चोख पार पाडली आहे. एकंदरीतच महिलांमध्ये एकजुटीची आणि प्रोत्साहनाची भावना असल्याचा एक संदेश ह्या चित्रपटाच्या टिझर मधून मिळतो. 'आता थांबायचं नाय!' हा सिनेमा भावनिक तर आहेच पण त्या सोबतच प्रेरणादायक आणि मनोबल वाढवणारा आहे. तसेच पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

झी स्टुडिओज् ने मराठी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा , या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२५ रोजी 'आता थांबायचं नाय!' हा दमदार चित्रपट आपल्या समोर मोठ्या पडदयावर सादर करायला सज्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT