Ashok Saraf Ranjana Deshmukh x
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf : लोक काहीही बोलतात… पण ते 'तिच्या'सोबत होते, अशोक सराफांच्या अवस्थेबद्दल भावनिक खुलासा

Ashok Saraf Ranjana Deshmukh : अरुण नाडकर्णी यांच्या एका लेखाची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. या लेखामध्ये अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांच्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Yash Shirke

  • रंजना देशमुख यांच्या अपघातानंतर अशोक सराफ यांनी त्यांना साथ सोडली अशी चर्चा होती.

  • पण अरुण नाडकर्णी यांच्या लेखाने वेगळी बाजू समोर आणली आहे.

  • नाडकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, सराफ रुग्णालयात दररोज पोहोचत असत, पण त्यांना रंजनांना भेटू दिलं जात नव्हतं.

  • अपमान सहन करतही ते रुग्णालयाच्या कोरिडॉरमध्ये तासन्तास बसत असत, असा भावनिक खुलासा लेखात करण्यात आला आहे.

Ashok Saraf Ranjana : रंजना देशमुख या सत्तर-ऐंशीच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्री म्हणून नावारूपास आल्या होत्या. सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. गुपचूप गुपचूप, बिनकामाचा नवरा अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांत त्यांच्या भूमिका गाजल्या. अशोक सराफ यांच्यांशी त्यांचे नाव जोडले गेले. त्याच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होती.

सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान रंजना यांचा अपघात झाला आणि त्यांचे आयुष्य उद्धव झाले. अशोक सराफ यांनी अपघातानंतर रंजना यांना सोडले. अशोक यांनी रंजना यांच्यासोबतचे संबंध तोडल्याचा अफवा त्यावेळेस पसरल्या होत्या. या सर्व चर्चा खोडून काढणाऱ्या अरुण नाडकर्णी यांच्या एका लेखाची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. या लेखात रंजना यांच्या अपघातानंतर अशोक सराफ त्यांना भेटण्यासाठी गेले होते. पण त्यांना भेटू दिले गेले नाही, असा खुलासा अरुण नाडकर्णी यांनी केला आहे.

अभिनेत्री रंजना देशमुख यांचा विषय निघाला की, अशोक सराफ यांना ट्रोल केले जाते. रंजना यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी साथ दिली नाही असं म्हणत अशोक सराफ यांच्यावर टीका होते. पण अशोक सराफ यांची बाजूही समजावी याचा एक प्रयत्न, असे म्हणत फेसबुकवर अरुण नाडकर्णी यांचा लेख शेअर करण्यात आला आहे.

अरुण नाडकर्णी यांच्या लेखामध्ये काय आहे?

रंजना ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. त्याच हॉस्पिटलमध्ये माझी काकूसुद्धा होती. मणक्याच्या आजारामुळे काकूवर उपचार सुरु होते. तेव्हा तिने खूप जवळून सगळं पाहिलं. ती रंजना यांच्या शेजारच्या रुममध्ये होती. अशोक सराफांना रंजना यांना भेटू दिले जात नसे, संध्याबाई (रंजना यांच्या मावशी) आणि रजनी यांची आई या तिथेच असायच्या. त्या अशोक सराफ यांचा पाणउतारा करायच्या. माझी काकू सगळं ऐकत असायची.

तरीही अशोक सराफ गप्प बसायचे. रुमच्या बाहेर कोरिडोरमध्ये ते दिवसभर बसून राहायचे. संध्याबाई तेथे तमाशा करायच्या. पण ते खाली मान घालून ऐकून घ्यायचे. कितीतरी दिवस हे सगळं कितीतरी दिवस सुरु होते. काकू अशोक सराफांना हे इतकं तुम्ही का ऐकून घेता? असं विचारायची. तेव्हा ते हसून उत्तर देणे टाळायचे. रंजना यांचा डिस्चार्ज होईपर्यंत ते दररोज अपमान सहन करत कोरिडोरमध्ये बसून असायचे. माझे काका-काकू याचे साक्षीदार आहेत. रंजना यांच्यावरुन कुणी त्यांना टार्गेट केले तर माझ्या काकूला सहन होत नाही. नाण्याची दुसरी बाजू मी स्वत: बघितलीय, असं ती म्हणते.

पण या पोस्टची तथ्यता अजून समजू शकली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

Bull Beauty Parlour: नंदुरबारमध्ये बैलांचं ब्युटी पार्लर

Raj Thackeray Meeting Devendra Fadnavis: बेस्ट पराभवानंतर अवघ्या २४ तासात राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला चर्चांना उधाण

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं संघ दक्ष, RSS च्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी? कंगनाच्या घरी काय घडलं?

IT Job Crisis: आयटी क्षेत्रात नोकर कपात; 80 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

SCROLL FOR NEXT