Ashok Mama SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Mama: अशोक मामांनी घेतला मोठा निर्णय; राधा मामी अन् किशा मामाला काढणार घराबाहेर, पाहा VIDEO

Ashok Mama Serial Update : 'अशोक मा.मा.' मालिकेत आता रंजक वळण आले आहे. अशोक मामा राधा मामी आणि किशा मामाला घराबाहेर काढणार आहेत. नेमकं मालिकेत काय घडणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांची सध्या 'अशोक मा.मा.' ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. 'अशोक मा.मा.' मालिकेत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राधा आणि किश्याच्या कावेबाज युक्त्यांना अखेर मामा कंटाळले असून आता अशोक मामा या दोघांना घराबाहेरचा रस्ता दाखवणार आहेत. घरामध्ये आलेल्या दिवसापासूनच दोघांचे डावपेच सुरू आहेत. पण मामा सगळे सहन करत होते. आता मात्र ते असह्य झाल्याने मामा हा निर्णय घेणार आहेत.

' अशोक मा.मा.' मालिकेत किश्या मामा सीसीटीव्ही फूटेजबद्दल देसाई-तोरणेला विचारतात आणि राधाला सांगतात की फुटेज काढण्याचा उपाय सापडला आहे. त्याचवेळी किश्याला एक महत्त्वाची फाईल सापडणार आहे. अशोक मामा, राधा आणि किश्या यांना चंदनच्या कोकणातील घरी कामासाठी पाठवण्याचा निर्णय घेतात. किश्या फाईल घेऊन सोसायटी ऑफिसमध्ये जातो आणि मामांच्या घराचे पेपर्स दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यात काही सापडत नाही. त्याचा डाव फसतो. पण सगळे घडलेले परशु ऐकणार आहे.

किश्या मामांची सर्व माहिती परशु अशोक मामांना दिल्यावर मामा तातडीने भैरवीला घरी बोलावणार आहेत. मामांना सत्य कळले आहे हे राधा आणि किश्याला समजताच ते मामांची माफी मागणार आहेत. पण मामा त्यावर बोलतात की, "तुम्ही आम्हाला फसवलं आहे" असे बोलून ते दोघांचे बॅग्स घराबाहेर फेकतात. अशोक माम ठणकावून सांगतात की, "ह्या पुढे आमच्या घराजवळ फिरलात तर पोलीसात तक्रार करेन" त्यानंतर अशोक मामा रागात दरवाजा बंद करतात.

'अशोक मा.मा.' मालिका आता रंजक वळणावर आली आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय, होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'अशोक मा.मा.' या मालिकेचा विशेष भाग रविवारी 22 जून रोजी दुपारी २:३० वाजता आणि रात्री ८:३० वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT