Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव लाखो तरुणांच्या मनाला नेहमी भुरळ घालत असते.
सायली संजीव आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे नाते खूप खास आहे.
सायली संजीव ही अशोक सराफ यांना पप्पा आणि निवेदिता सराफ यांना मम्मा म्हणते.
सायली आणि अशोक मामांचे हे खास नाते तुम्हाला माहितीये का?
अशोक मामा सायली संजीवला मुलगी मानतात.
सायलीची काहे दिया परदेस मालिका सुरु झाल्यावर अनेकांना ती निवेदिता सराफ यांच्यासारखी दिसत असल्याचे वाटले.
अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांनादेखील आपल्याला मुलगी असती तर ती अशीच असती, असं वाटलं.त्यामुळे त्यांनीही सायलीला मुलगी मानले.
सायलीने अशोक मामांना मी तुम्हाला काय म्हणू असा प्रश्न विचारला होता.
तेव्हा अशोक मामा म्हणाले की, तू तुझ्या वडिलांना बाबा म्हणतेस तर मला पप्पा म्हण.