Shreya Maskar
ब्युटी क्वीन ऐश्वर्या रायने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने जगाला भुरळ घातली आहे.
ऐश्वर्या राय बच्चनचे बीकेसीमध्ये आलिशान अपार्टमेंट आहे. याची किंमत जवळपास 21 कोटी रुपये आहे.
मुंबईतील वरळी येथे ऐश्वर्याचे अजून एक लग्जरी अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत 41 कोटी रुपये आहे.
दुबईत तिचा व्हिला देखील आहे, ज्याची किंमत जवळपास 15.6 कोटी रुपये आहे.
ऐश्वर्याकडे रॉल्स रॉईस, लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज आणि ऑडी या लग्जरी कार आहेत. यांची किंमत कोटींच्या घरात आहे.
ऐश्वर्या एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी 7-8 कोटी रुपये घेते.
तर ऐश्वर्या राय एका चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपये मानधन घेते.
ऐश्वर्या रायने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यातून तिला कोट्यवधींचा नफा होतो.
मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती जवळपास 800 कोटी रुपये आहे.