Ashok Ma. Ma : अशोक मामांच्या आयुष्यात नव्या पाहुण्यांची एन्ट्री, राधा मामी अन् किशा काकांच्या येण्यानं मालिका घेणार नवं वळण

Ashok Ma. Ma Marathi Serial Update : 'अशोक मा.मा.' मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत आता नवीन कलाकरांची एन्ट्री पाहायला मिळाली आहे. हे नवीन सदस्य मालिकेत कसा धुमाकूळ घालणार जाणून घेऊयात.
Ashok Ma.Ma Marathi Serial Update
Ashok Ma.MaSAAM TV
Published On

'अशोक मा.मा.' (Ashok Ma.Ma) मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत आता नवीन कलाकरांची एन्ट्री पाहायला मिळाली आहे. मालिका आता कोणते वळण घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'अशोक मा.मा.' मालिकेत राधा मामी आणि किशा काकांची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. चंद्रपूरच्या ओवळा गावातून राधा मामी आणि किशा काका आले आहेत. हे मालिकेत आता कथेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या या जोडप्यासाठी शहरातले वातावरण नवीन असले तरी त्यांची ठाम विचारसरणी आणि श्रद्धाळूपणा त्यांना वेगळे ठरवतो. विशेष म्हणजे भैरवीच्या तडक-फडक स्वभावाशी त्यांची गाठ पडणार असून यातून अनेक घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. आता प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन होणार आहे. राधा मामींची भूमिका वर्षा दांदळे तर किशा काकांची भूमिकेत प्रकाश डोईफोडे दिसणार आहेत.

'अशोक मा.मा.' मालिकेत प्रियाने केलेल्या नाटकानंतर भैरवीला राधा मामींनी चांगलेच सुनावले. त्यांच्या दृष्टीने भैरवीने संयमाने आणि मायेने वागले पाहिजे. मात्र, भैरवीच्या तडक फडक वागण्यामुळे दोघींमध्ये ठिणग्या उडाल्या. आता भैरवी राधा मामींना आपली बाजू पटवून देऊ शकेल का? पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

वेणूच्या भावाला आणि वहिनीला योग्य पाहुणचार देण्याचे अशोक मामांनी ठरवले असले तरी या सगळ्या गोंधळात ते नेमकी कशी भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भैरवीच्या स्वभावाचा अंदाज त्यांना आहे. मात्र राधा मामींची थोडीशी शिस्तबद्ध आणि कठोर बाजू त्यांच्यासाठी नवीन आहे. राधा मामी भैरवीला चांगलेच आव्हान देणार आहे. येत्या भागांमध्ये मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'अशोक मा.मा.' मालिका कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पाहायला मिळते.

Ashok Ma.Ma Marathi Serial Update
Ranbir Kapoor : तिकीट टू हॉलिवूड! रणबीर कपूरला जेम्स बॉण्ड चित्रपटाची लॉटरी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com