Granddaughter Zanai Bhosle shares update on Asha Bhosle’s health as fans await recovery news. saam tv
मनोरंजन बातम्या

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Asha Bhosle Health Health Update: प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची प्रकृती खालावल्याच्या बातमीने चाहते चिंतेत पडले आहेत. त्यांची नात जनाई भोसले यांनी आजी आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत नवीन अपडेट दिली आहे.

Bharat Jadhav

  • आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत नवी अपडेट

  • जनाई भोसले यांनी दिली माहिती

  • प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती

संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत त्यांची नात जनाई भोसले यांनी एका पोस्टद्वारे नवी अपडेट दिली आहे.

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी नुकतीच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आशा भोसले यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. यासह तिने प्रायव्हसी द्यावी अशीही विनंती केली आहे. तसेच त्यांनी आशा भोसले यांच्यासोबतचा स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे.

पोस्टमध्ये काय लिहिले आहे?

पोस्टमध्ये जनाईने लिहिले की, "माझी आजी, आशा भोसले खूप अशक्तपणा आणि छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल आहेत. आम्ही विनंती करतो की तुम्ही त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करावा. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि आशा आहे की सर्व काही ठीक होईल. आम्ही तुम्हाला लवकरच माहिती देऊ."

९२ वर्षीय आशा भोसले यांनी हजारो गाण्यांना आपला आवाज देऊन चित्रपटसृष्टीत मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आशा भोसले यांना हार्ट अटॅक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बातमीमुळे चाहते चिंतेत पडले आहेत. परंतु त्यांना हृदयविकाराचा झटका आला नव्हता. याबाबतची महिती जनाईच्या पोस्टमधून दिली आहे, तिची आजी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला नव्हता. तर संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT