Marathi Actor: काम केलं पण पैसेच मिळाले नाहीत! मराठी अभिनेत्यावर पावणे दोन कोटींचं कर्ज; स्वत:च केला खुलासा

Marathi Actor: मराठी अभिनेत्याने एका मुलाखतीत आर्थिक अडचणींचा खुलासा केला. कोटींचं कर्ज, काम करूनही पैसे न मिळाल्यामुळे आलेल्या संकटांबाबत त्यांनी मनमोकळं बोललं.
famous marathi actor digamber naik
famous marathi actor digamber naikSaam Tv
Published On

Marathi Actor: मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे दिगंबर नाईक सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. या मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्यातील कठीण आर्थिक परिस्थितीबाबत मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. याचवेळी त्यांनी स्वत:वर पावणे दोन कोटींचे कर्ज असल्याचाही उल्लेख केला.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत पावणे दोन कोटींचे कर्ज असतानाही आयुष्य जगणं सुसह्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना दिगंबर नाईक यांनी सांगितले की, सुरुवातीला आम्ही नवरा-बायको होतो, मग मुले झाली. मोठे घर ही एक गरज आहे. त्यासाठीच कर्ज घेतलं. पण नंतर कर्ज वाढलं. कोविड आला, नोटबंदी पण झाली आणि यामुळे कर्ज वाढत गेलं. कर्ज वाढतच जातं. अनेकांवर कर्ज असणार, फक्त बोलतोय हा दिगंबर नाईक.

famous marathi actor digamber naik
Bollywood Actress: प्रसिद्ध अभिनेत्रीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक; स्वत: पोस्ट करून चाहत्यांना दिली माहिती

आपलं ‘संघर्ष’ सांगताना दिगंबर नाईक म्हणाले, 'फू बाई फू नंतरही असे दिवस बघितले आहेत, की ज्यावेळी माझ्या खिशात फक्त दोन रुपये होते. पैसे नसल्याने मी अनेकदा चालत प्रवास केला आहे. याला आता लोक ‘संघर्ष’ म्हणतात.  आजही मी दळण घेऊन येतो. आजही भाजी मीच आणतो. मासे वगैरे घ्यायला स्वत: मीच जातो. मला सेलिब्रिटी असल्याचे काही वाटत नाही. जे कर्ज आहे ते नक्कीच फिटेल. सातत्याने काम असेल तर कर्ज फिटत जातं. माझ्याकडे कुठली प्रॉपर्टी नाही.

famous marathi actor digamber naik
Raja Shivaji Song: 'लाख मराठ्यांची तू आग रे…! 'राजा शिवाजी'च्या पहिल्या गाण्याने अंगावर काटा; अजय-अतुलचा BTS व्हिडिओ पाहाच

कामाचे पैसेचं मिळाले नाहीत

माझ्याकडे कुठली प्रॉपर्टी नाही. मला शून्यातून विश्व निर्माण करायचं होतं. मला काही लोकांनी कामाचे पैसेच दिलेले नाहीत.यावर काय करणार? रडणार का? आता कुठे पैसे मागायला जाणार. आतापर्यंत कामाचे एकूण पैसे मोजले तर १५-१७ लाख रुपये बाकी आहेत.. देतो, नंतर देतो, अजून नाही आले असं म्हणून हे पैसे बुडाले आहेत.”

दिगंबर नाईक हे ‘फू बाई फू’ आणि ‘बिग बॉस मराठी’ सारख्या कार्यक्रमांमुळे घराघरात पोहोचले. मात्र, लोकप्रियता मिळूनही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, ही वस्तुस्थिती त्यांनी या मुलाखतीतून समोर आणली. दिगंबर नाईक यांच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील आर्थिक वास्तव पुन्हा चर्चेत आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com