Aryan Khan New Business Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aryan Khan Cast Shahrukh Khan: वोडका कंपनीनंतर आर्यन खानने सुरू केला नवीन बिजनेस; चक्क शाहरुख झाला लेकाचा ब्रँड अम्बॅसेडर

Shah Rukh Khan Sons New Business: दिग्दर्शनाच्या पदार्पणातच आर्यन खानने शाहरुख खान सोबत काम केले आहे.

Pooja Dange

Aryan Khan Makes His Ad Debut: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एकापाठोपाठ एक नवीन स्टार्टअप लॉन्च करत आहे. गेल्या वर्षी, त्याने वोडका बनवणारी कंपनी सुरू केली आणि आता एक स्ट्रीटवेअर ब्रँड घेऊन तो आला आहे. यासाठी त्याने एक जाहिरात शूट केली आहे ज्यामध्ये शाहरुख खान दिसणार आहे.

शाहरुख खानने स्वत: त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओची झलक शेअर केली आहे. विशेष म्हणजे आर्यन खानने या जाहिरातीचे दिग्दर्शनही केले आहे. म्हणजेच त्याच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणातच त्याने शाहरुख खान सोबत काम केले आहे.

आर्यन खानच्या या लाइफस्टाइल ब्रँडचे नाव D yavol.x आहे. आर्यनने गेल्या वर्षीच याबाबत माहिती दिली होती. शाहरुखने काल या जाहिरातीचा टीझर शेअर केला. आज या जाहिरातीचा संपूर्ण व्हिडिओ समोर येणार आहे. या ब्रँडची माहिती आर्यन खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिली होती.

आर्यन खानने गेल्या वर्षीच बिझनेस करायला सुरुवात केली होती. त्याने काही मित्रांसोबत D'YAVOL नावाची व्होडका कंपनी सुरू केली. आता त्याने लाईफस्टाईल ब्रँड Dyavol.x सुरू केले आहे. आर्यनने सांगितले होते की, हे त्याच्या आणि त्याच्या पार्टनरच्या मेहनतीचे फळ आहे. (Latest Entrainment News)

आर्यनने स्वतः पोस्टमध्ये सांगितले की, त्याने ही लाईफस्टाइल कंपनी 5 वर्षांपूर्वी सुरू केली होती. एका मुलाखतीत त्याने सांगितले की लोकांना त्याच्या ब्रँडचे लिमिटेड एडिशन मिळेल आणि त्यांच्या ब्रँडची खरेदी वेब स्टोअरद्वारे करता येईल.

आर्यन खानने गेल्या वर्षीच त्याच्या पहिल्या प्रोजेक्टचे लेखन पूर्ण केले होते. आर्यन हा प्रोजेक्ट त्याच्या वडिलांच्या कंपनी रेड चिलीजसोबत करत आहे. आर्यन खानला अभिनयात करिअर करायचे नसल्याचे शाहरुख खानने आधीच सांगितले आहे. आर्यन चांगला लेखक असल्याचे देखील तो म्हणाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT