Arijit Singh's Birthday: रिजेक्शन पचवून गाठले यशाचे शिखर; खडतर होता गायक अरिजित सिंगचा प्रवास

Arijit Singh's Journey: अरिजित सिंगचा प्रवास सोपा नव्हता.
Arijit Singh
Arijit SinghSaam TV
Published On

Arijit Singh's Journey To Become Top Singer: 'केसरिया', 'चन्ना मेरे', 'ए दिल है मुश्किल' आणि 'तुम ही हो' सारखी अनेक हिट गाणी गायलेला गायक अरिजित सिंगचा आज २५ एप्रिलला वाढदिवस आहे. अरिजित तरुण गायकांमधील टॉप गायकांपैकी एक आहे. त्यांनी गायलेली गाणी रिलीज होताच चार्टबस्टर्सच्या यादीत समाविष्ट होतात.

गेल्या काही वर्षात त्याने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. रोमँटिक आणि इमोशनल गाण्यांना अरिजितची पहिली पसंती असते. त्याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 'पद्मावत'मधील 'बिंटे दिल' या गाण्यासाठी अरिजितला हा किताब मिळाला आहे.

अरिजित सिंगचा प्रवास सोपा नव्हता. प्रगतीच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला अनेक अडथळे पार करावे लागले. रिअॅलिटी शोमधील नकारापासून ते गाण्यांच्या कॅनिंगपर्यंत, अरिजितला नशिबाने अनेकवेळा आजमावले आहे.

Arijit Singh
Jai Jai Maharashtra Majha New Song: केदार शिंदेंनी घातला घाट; महाराष्ट्र गीतातून कलाकारांना एकत्र आणत शाहीर साबळेंना वाहिली आदरांजली

अरिजित सिंगचा जन्म 25 एप्रिल 1987 रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झाला. त्याचे वडील कक्कर सिंग शीख होते, तर आई अदिती बंगाली होती. लहानपणापासूनच अरिजितचा संगीताकडे कल होता. त्याने अगदी लहानपणापासूनच संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

अरिजित सिंग पहिल्यांदा 2005 मध्ये 'फेम गुरुकुल' या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. या शोमध्ये 18 वर्षीय अरिजितला लोकांचे खूप प्रेम मिळाले. त्याने जावेद अख्तर, केके आणि शंकर महादेवन या परीक्षकांची मनेही जिंकली, पण शोच्या टॉप 5 मध्ये गेल्यानंतर त्याला मागे फिरावे लागले. कमी मतांमुळे सहाव्या क्रमांकावर पोहोचल्यानंतर अरिजितला शोमधून बाहेर पडावे लागले.

अरिजित सिंग 'फेम गुरुकुल'चा विजेता ठरला नसला तरी त्याच्या आवाजाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी अरिजितसोबत काम करण्याचे आश्वासन दिले. संजय लीला भन्साळीच्या सावरिया मधील 'युं शबनमी' या गाण्याला अरिजीतने आपला आवाज दिला, पण त्याचे ते गाणे कधीच प्रदर्शित झाले नाही. (Latest Entertainment News)

टिप्सचे मालक रमेश तुराणी यांनीही अरिजितला एक अल्बम ऑफर केला, परंतु तो अल्बम देखील कधीही प्रदर्शित झाला नाही. प्रतिभा आणि आवड असूनही अरिजितला खूप संघर्ष करावा लागला.

'फेम गुरुकुल' नंतर अरिजितने आणखी एका रिअॅलिटी शो '10 के 10 ले गये दिल'मध्ये भाग घेतला. या शोमध्ये 'इंडियन आयडॉल' आणि 'फेम गुरुकुल'च्या स्पर्धकांमध्ये फेम ऑफ होता. अरिजितने हा शो जिंकला आणि 10 लाखांच्या बक्षीस रकमेसह स्वतःचा संगीत स्टुडिओ सुरू केला.

Arijit Singh
R Madhavan's Spoke About Son's Debut: तुझा मुलगाही आता अभिनेता होणार? प्रश्नावर आर माधवनच्या उत्तराने जिंकलं मन

यानंतर अरिजितच्या करिअरला काहीसा वेग आला. त्याने 2010 मध्ये 'गोलमाल 3', 'क्रुक' आणि 'अॅक्शन रिप्ले' या तीन चित्रपटांसाठी संगीतकार प्रीतमसोबत त्याने काम केले.

अरिजित सिंगने 2011 मध्ये आलेल्या 'मर्डर 2' या चित्रपटातून गायक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटातील 'फिर मोहब्बत' या गाण्याला त्याने आवाज दिला. या गाण्यात अरिजितची दखल घेण्यात आली होती, पण 'आशिकी 2'ने खळबळ उडाली आणि अरिजित रातोरात स्टार झाला.

2013 मध्ये 'आशिकी 2' मधील 'मेरी आशिकी तुम ही हो' हे गाणे अरिजितने गायले. चित्रपटापेक्षा त्याच्या गाण्यांनी जास्त चर्चा झाली होती. अरिजितला 'आशिकी 2'साठी फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला आहे. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com