Aryan Khan
Aryan Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aryan Khan: आर्यन खान बॉलिवूडमध्ये येतोय, 'ती' शंका अन् आता पुन्हा चर्चेला उधाण

Chetan Bodke

Aryan Khan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा किंग खान हा बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे, हे आता जवळपास ठरलं आहे. त्याच्या एन्ट्रीने चाहत्यांसह नेटकऱ्यांना या बातमीमुळे बराच आनंद झाला आहे. गेल्या वर्षी आर्यन चांगलाच वादाच्या कचाट्यात सापडला होता. तो वाद आर्यन खान ड्रग्ज प्रकरण. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले होते. त्या प्रकरणामुळे जवळपास महिनाभर तुरुंगात होता.

आर्यनवर क्रुझवरील पार्टीसाठी जाणे, त्याच्याकडे ड्रग्ज सापडणे आणि त्या प्रकरणात त्याचे नाव अडकणे हे सर्व आरोप त्याच्यावर लावण्यात आले होते. आर्यनच्या अटकेनंतर बऱ्याच कलाकारमंडळींना धास्ती भरली होती. काही करुन आर्यनला बाहेर काढण्यासाठी शाहरुखने देशातील उत्तमोत्तम वकिलांचा फौज फाटा तयार केला होता. त्याने अखेर आपल्या मुलाला यासर्व प्रकरणातून बाहेर काढलेच. या सर्वात आर्यन कमालीचा सोशल मीडियावर ट्रोल आणि तितकाच चर्चेच्या अग्रस्थानी राहिला.

आर्यनला जामिन मिळून तुरुंगातून बाहेर आला. कधी काळी स्टार किड्स आणि फक्त शाहरुखचा मुलगा असलेल्या आर्यनला स्वत:ची वेगळी प्रतिमा मिळाली. त्याचे नाव अनेकांच्या ओठी आले. जवळपास तीन आठवड्यांहून अधिक काळ आर्यन या ना त्या माध्यमातून चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या चर्चेत राहिला. किंग खानच्या घराबाहेर नेहमीच चाहत्यांची रेलचेल सुरु असते. आपल्या आवडत्या अभिनेत्याची खास झलक पाहण्यासाठी सर्वच चाहते अगदी आतुर असतात.

शाहरुखचे घर पाहण्यासाठी चाहतेच नाही तर कलाकारही फार आतुर असतात. त्यावेळचा काळही शाहरुखसाठी फार वेगळा होता. शाहरुखच्या घराबाहेरील गर्दीनेच त्याला फार मोठा आधार होता. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण हा एक राष्ट्रीय प्रश्न तयार झाला होता. त्यामुळे बऱ्याच जणांना त्याचे व्यक्तिमत्व, त्याच्यावर असलेले आरोप आणि शाहरुखनचा मुलगा अशा दृष्टीकोनातून सहानुभूती मिळत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

शाहरुखकडून हे सर्व कोणत्या कारणासाठी तर केले जात नाही ना? अशी शंका त्यावेळी ट्रोलर्स विचारत होते. आता आर्यनच्या बॉलिवूडच्या एंट्रीने त्यावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे. एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ज्याप्रकारे वेगवेगळ्या कॉन्ट्राव्हर्सीचा उपयोग केला जातो, त्याच पद्धतीने हे सर्व केले जात आहे का असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता.

एनसीबीने आपल्या युक्तीवादात तेव्हा सांगितले की, आर्यनकडून जे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते त्याची किंमत १ लाख ३३ हजार एवढी होती. २६ दिवसांच्या कोठडीनंतर २८ ऑक्टोबरला आर्यनला जामीन मिळाला होता.

आता आर्यन खान हा आ्रता बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. आर्यनने स्क्रिप्टवरील काम संपवले असून आता तो दिग्दर्शनासाठी तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याला अॅक्टिंगमध्ये नव्हे तर दिग्दर्शनात आवड आहे. शाहरुखनं देखील यापूर्वीच्या त्याच्या कित्येक मुलाखतीमध्ये त्याविषयी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Speech: असत्य बोलणं मोदी साहेबांचे वैशिष्ट्य... माढ्याच्या सभेतून शरद पवारांचा प्रहार; केंद्र सरकारवर टीकास्त्र

Today's Marathi News Live : पुण्यात भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस विरोधात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

Reasons for Obesity : 'या' कारणंमुळे तुमचे वजन झपाट्याने वाढतंय

Gold Smuggling : मुंबई विमानतळावर गुदद्वार, अंतर्वस्त्रातून सोने तस्करी; कस्टम विभागाकडून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

Vande Bharat Metro: वंदे भारत मेट्रोचा फस्ट लूक व्हायरल; लवकरच प्रवाशांच्या सेवेत, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT