उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेलेल्याच सांगत आहेत. पण २०१४ पासून उद्धव ठाकरे साडेसात वर्षे सत्तेत होते. मग उद्योग गुजरातला गेले कसे? असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. आज नारायण राण यांच्या प्रचारार्थ कोकणात सभा होत आहे. या सभेतून त्यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या शिवनी वनपरिक्षेत्रातील बामणी माल येथील दीपा दिलीप गेडाम ही 33 वर्षीय महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. सकाळी तेंदूपाने गोळा करण्यासाठी गेलेल्या दिपावर वाघाने हल्ला करत तिला ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोचली. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या वारसांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड ,कुही गावाजवळ भूकंपाचे केंद्र
आज दुपारी 2.24 वाजता 2.4 तीव्रतेचा भूकंपाची नोंद
जमिनीपासून 5 किलोमीटर भूकंपाची खोली
भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने धक्के जाणवले नाही
शुक्रवारी (काल) ही पारशवीनी शिवारात जाणवले होते, सौम्य तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या छाननीत १७ उमेदवारांचे अर्ज वैध तर ४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. या मतदारसंघासाठी २१ उमेदवारांनी ३० नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते.
छाननीअंती वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी
१) अरविंद गणपत सावंत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) मोहम्मद शुऐब बशीर खतिब - बहुजन समाज पार्टी
३) यामिनी यशवंत जाधव- शिवसेना
४) अफजल शब्बीर अली दाऊदानी - वंचित बहुजन आघाडी
५) मो. नईम शेख - एम पॉलिटिकल पार्टी
६) राहुल फणसवाडीकर - लोकशाही एकता पार्टी
७) सुभाष रमेश चिपळूणकर - राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी
८) अनिता अशोक गालफाडे - अपक्ष
९) अरविंद नारायण सावंत - अपक्ष
१०) पंकज लक्ष्मण म्हेतर - अपक्ष
११) प्रशांत प्रकाश घाडगे - अपक्ष
१२) मतीन अहमद नियाज अहमद रंगरेज - अपक्ष
१३) मनिषा शिवराम गोहिल - अपक्ष
१४) डॉ. मयुरी संतोष शिंदे - अपक्ष
१५) मोहम्मद महताब अख्तर हुस्सेन शेख - अपक्ष
१६) शंकर सोनवणे - अपक्ष
१७) सबीहा बानो - अपक्ष
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या छाननीत १५ उमेदवारांचे अर्ज वैध तर १७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. या मतदारसंघासाठी ३२ उमेदवारांनी ४१ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते.
छाननीअंती वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी
१) अनिल यशवंत देसाई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) राहुल रमेश शेवाळे - शिवसेना
३) विद्यासागर भिमराव विद्यागर - बहुजन समाज पार्टी
४) अबुल हसन अली हसन खान - वंचित बहुजन आघाडी
५) डॉ. अर्जुन महादेव मुरुडकर - भारतीय जवान किसान पार्टी
६) ईश्वर विलास ताथवडे - राष्ट्रीय महास्वराज भूमि पार्टी
७) करम हुसैन किताबुल्लाह खान - पीस पार्टी
८) जाहीद अली नासिर अहमद शेख - आजाद समाज पार्टी (कांशी राम)
९) दिपक एम. चौगुले - बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
१०) महेंद्र तुळशीराम भिंगारदिवे - राईट टु रिकॉल पार्टी
११) सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी - सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया
१२) अश्विनी कुमार पाठक - अपक्ष
१३) आकाश लक्ष्मण खरटमल - अपक्ष
१४) विवेक यशवंत पाटील - अपक्ष
१५) संतोष पुंजीराम सांजकर - अपक्ष
मल्टीपर्पज कन्या प्रशाला मैदान हाऊसफुल्ल
शाळेच्या बिल्डींगवर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उभे
ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उध्दव ठाकरेंची सुरू आहे सभा
शिवसेनेच्या कार्यकर्त्याला धमकवल्या प्रकरणी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल
राजाराम गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
शिवसेनेतर्फे मिसळ पे चर्चा कार्यक्रम घेतला म्हणून शिवागिळ केल्याचा आरोप
न्यू पॅलेस परिसरातील घटना
राजाराम गायकवाड हे मालोजीराजे यांचे कट्टर समर्थक
राज ठाकरे व नारायण राणे याची वीस वर्षा नंतर भेट
कणकवली येथील हॉटेल नीलम कंट्री येथे भेट.
काही वेळातच राज ठाकरे सभा स्थळी दाखल होतील
अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण
मृत आरोपी अनुज थापनच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह घेतला ताब्यात
जेजे रुग्णळ्यातून कुटुंबीयांनी आवश्यक कायदेशीर कारवाई पूर्ण करून मृत देह ताब्यात घेतला
कुटुंबीय मृतदेह घेऊन आपल्या गावी पंजाबला जाणार
त्यानंतर पंजाबच्या मूळगावी करण्यात येणार अंत्यसंस्कार
मृत आरोपी अनुज थापनची आजारी आईसाठी अंतीमसंस्कर करणार मूळगावी
थापनचे कुटुंबीय सीआयडी तपासावर समाधानी नाही
सीबीआय तपासासाठी कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे याचिका दाखल
यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर आणि शिवसेना शिंदेकडून रवींद्र वायकर यांचे अर्ज वैध तर मनीषा वायकर यांनी सुद्धा अपक्ष अर्ज भरला आहे
तसेच अमोल किर्तीकर यांच्या पत्नी सुप्रिया किर्तीकर यांनी सुद्धा ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 6 मे असून यातून कोण उमेदवारी अर्ज मागे घेईल ते बघावं लागेल
जत मध्ये आलो तर आज सगळीकडे हिरवेगार बघून मला खूप आनंद झाला.
संजय पाटील माझ्याकडे वारंवार आले आणि ते मागणी करत होते. प्रकल्प सुरू झाले पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्र मधले जे सिंचन योजनेचे प्रकल्प बंद पडले होतं. त्याला गती देण्यासाठी आम्ही बळीराजा जलसंजीवनी मधून आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रामुख्याने ताकारी म्हैसाळ तसेच सोलापूर जिल्ह्यातील योजनांना 6 हजार कोटी रुपये दिले. या देशामध्ये पाण्याची कमी नाही. पण मी शेतकरी आहे मला माहित आहे की पाण्याकरिता सर्व गोष्टी आहेत. शेतकऱ्याला समृद्ध करायचा असेल, गाव समृद्ध संपन्न करायचे असेल, स्मार्ट विले निर्माण करायचा असेल तर प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याला पाणी मिळायलाच पाहिजे. तर ग्रामीण भागात सूत्र बदलून जाईल.
मी प्रधानमंत्री सिचन योजनेतून 2100 कोटी आणले आणि जतला पाणी आणले. किती निवडणुका झाल्या आणि पाण्यावर राजकारण केले गेले.
उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यावेळी काम ठप्प झालं. आणि नंतर शिंदे साहेबांचा सरकार आल्यावर जत मध्ये पाण्यासाठी मंजुरी आणली आणि पाणी आणले.
ताकारी टेंभूसाठी माणस अंगावर घेतली आणि पाण्यासाठी काम केलं.
म्हैसाळ विस्तारित योजना उद्घाटन करण्यापूर्वी कामाला सुरुवात केली. 11 टीएमसी एकट्या जत तालुक्याला दिले.
पुढची 5 वर्ष मी जनतेसाठी काम करणार आहे.
मी आलेल्या माणसांना भेटतो. कोणाची चिठ्ठी आली म्हणून भेटत नाही. तर काही पुढाऱ्यांच्यातील दलाल एजंट आपल्यांना सोडून गेले भूलथापांना बळी पडू नका. जगताप याना टोला.
या सर्व दलालांना बाजूला ठेवा कोणाचेही ऐकू नका आणि जत तालुक्यातून मला मोठ्या प्रमाणात निवडून आणा.
कुणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे.
उल्हासनगर येथील कॅम्प क्रमांक पाच मध्ये लागली
जे के ऑर्किड इमारतीमध्ये लागली आग
आगीमध्ये अकाउंट कागदपत्र जळून खाक.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर.
सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी नाही
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू
शांतिगिरी महाराज, अनिल जाधव, भक्ती गोडसे यांनी पक्षाकडून दाखल केलेले अर्ज बाद
शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून, अनिल जाधव यांनी भाजपकडून तर भक्ती गोडसे यांनी देखील शिवसेनेकडून दाखल केला होता अर्ज
एबी फॉर्म न जोडल्यामुळे पक्षाकडून दाखल केलेले अर्ज बाद तर अपक्ष उमेदवारी मात्र कायम
अर्ज छाननीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एकूण 11 उमेदवारी अर्ज झाले बाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांजा धडाका लावला असून मुंबईतही दोन सभा होणार आहेत. 15 मे आणि 17 मे रोजी मोदींच्या होणार सभा.17 मे रोजी शिवाजी पार्क येथे होणार सभा तर 15 मे च्या सभेचे स्थळ होईल दोन दिवसात निश्चित
पूर्णा तालुक्यातील सुहागन शिवारात हिंस्र प्राण्यांनी शेळ्यांचा फडशा पाडला असून गोविंद पवार या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यां मध्ये भीतीचे वातावरण आहे, प्रसासनाने प्राण्याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
आज दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंह लवली यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मागच्या आठड्यात त्यांनी काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. लोकसभेच तिकीट न मिळाल्याने लवली नाराज होते.
उद्धव ठाकरेंची सभा झाली त्याच मैदानावर आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. व्यासपीठारील पोस्टर तसेच किंवा पोडियमवर फक्त कमळचं चिन्ह ठेवण्यात आलंय.
येणाऱ्या 2024 मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार येणार असल्याचे भाकीत शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी केले. ते सांगलीच्या जत येथे चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.तसेच जत तालुक्यातील 65 गावांचा पाण्याचा प्रश्न लवकरच पूर्णता मिटेल. आणि या गावांचा पाठिंबा चंद्रहार पाटील यांना भेटेल असेही पाटील म्हणाले.
बांदा येथे राज ठाकरे दाखल होताच भाजप व मन सैनिकांकडून जल्लोषात स्वागत.
राज ठाकरेंवर जेसीबीतून फुलांची उधळण. ढोल ताशा व फटाके फोडून स्वागत केले गेले.
बीडकरांना आता वाढत्या तापमानाचा सामना करण्याची वेळ आली आहे.अगोदरच दुष्काळ, पाण्याची कमतरता, त्यात तापमानाचा पारा वाढल्याने बिडकर मात्र आता त्रस्त झाले असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.. आज बीडचे तापमान हे 42 डिग्री सेल्सिअसवर असून यामुळे नागरिकांना अति उष्णतेचा सामना करण्याची वेळ आली आहे..त्याचबरोबर लाईटचा लपंडाव आणि पाण्याची कमतरता यामुळे बीडकरांची मात्र दमछाक होत आहे.
सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सीबीआय तपासाची केली मागणी
अनूजचा मृत्यू संशयास्पद असल्याचा याचिकेत दावा
मुंबई पोलीस तपास यंत्रणेवर गंभीर आक्षेप
अनुजच्या आईच्या वतीनं दाखल करण्यात आली आहे याचिका
या याचिकेवर लवकरच होणार सुनावणी
कल्याण लोकसभा मतदारसंघातुन आज स्क्रुटनी दरम्यान ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आणि रमेश जाधव या दोन्ही उमेदवारांचा अर्ज वैध ठरला आहे. येत्या सहा तारखेला सोमवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नॅशनल एलिजिबीटी कम इंट्रास टेस्ट (NIT) नीट ची परीक्षा उद्या 5 मे रोजी होणार आहे, दरम्यान या परीक्षेला समोर जाण्यासाठी लातूर जिल्ह्यातून जवळपास 25 हजार विद्यार्थी या परीक्षेला समोरे जाणार आहेत.
स्मार्ट सिटीच्या पाईपांना लागली भीषण आग लागलीय. धुराचे लोट दूरपर्यंत दिसत आहेत. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात. स्मार्ट सिटीच्या पाईपांना यापूर्वी होम मैदान परिसरात देखील लागली होती.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ
लोकसभा निवडणुक प्रचारा दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात काही अज्ञातांनी उदय सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती.
त्यानंतर पोलिसांनी उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
भाजप युवा मोर्चाच्या वतीने दादर फूल मार्केट येथे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. विजय वडेट्टीवार यांनी उत्तर मध्यचे उमेदवार वकील उज्ज्वल निकम यांच्याविषयी देशद्रोहाचा उल्लेख केला होता. त्यानंतर भाजप युवा मोर्चा हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या विरोधात मुर्दाबादचे नारे दिली. कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
प्रज्वल रेवण्णा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी लिहिलं पत्र
या प्रकरणातील पीडितांना शक्य ते सर्व सहकार्य करण्याची आपल्याला विनंती - राहुल गांधी
या गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे - राहुल गांधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहीत व्यक्त केल्या भावना
उद्धव ठाकरे यांची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा होणार
ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर
मल्टीपर्पज कन्या प्रशाला मैदानावर सभेची जय्यत तयारी सुरू
काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर
काल पुण्यात राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर नाराजी दूर
प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चंद्रकांत हंडोरे यांनी नसीम खान यांची काढली समजूत
नसीम खान यांची नाराजी दूर झाल्याने ते प्रचारात सक्रीय होणार?
सांगलीच्या एरंडोली येथे सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग.
हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मिरज तालुक्यातल्या एरंडोली येथे करण्यात आले लँडिंग.
सुरक्षितपणे एका शेतात झालं हेलिकॉप्टरचं लँडिंग
हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांची गर्दी झाली.
गोंदिया शहरातील फुलचुर नाका परिसरात एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीचे मोठे लोट दिसत आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
दादर रेल्वे स्थानकात अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागल्याची घटना घडली.
ब्रेकमधून धूर निघाल्याने प्रवाशांना तातडीने उतरविण्यात आलं.
आगीवर तातडीने नियंत्रण मिळवून ट्रेन रवाना
बी ९ कोच मधून धूर येत असल्याचं लक्षात येताच यंत्रणा सक्रियNe
मुलुंड पश्चिम येथील महाराणा प्रताप चौक बस डेपोत नेरूळ येथून येणाऱ्या 512 क्रमांक बसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा
वडाळा बस डेपो मेन कंट्रोलला आला मेल
पोलिसांनी आणि BDDS पथकाने केली एकूण ६ बसची तपासणी
तपासल्यानंतर मेलवरील धमकी अफवा असल्याचं निष्पन्न
शुक्रवारी आला होता धमकीचा मेल