Shilpa Tulaskar: मालिकेत रोमान्स तर वेबसीरिजमध्ये दिले इंटीमेट सीन, एका ट्रेलरने चाहत्यांमध्ये कुजबुज

'तू तेव्हा तशी' झी मराठीवरील मालिकेतील शिल्पा तुळसकर सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. हे नाव फक्त एका मालिकेपुरतंच मर्यादीत नसून हिंदी सिनेविश्वात हे गाजलेले नाव आहे.
Shilpa Tulaskar
Shilpa TulaskarSaam Tv

Shilpa Tulaskar: 'तू तेव्हा तशी' झी मराठीवरील मालिकेतील शिल्पा तुळसकर सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. हे नाव फक्त एका मालिकेपुरतंच मर्यादीत नसून हिंदी सिनेविश्वात हे गाजलेले नाव आहे. शिल्पाने मराठी मालिकेसोबतच हिंदी मालिकेतही उल्लेखनीय आणि महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मराठी मालिकेत शिल्पाने स्वप्निल जोशीसोबत इंटीमेट सीन दिले आहेत. त्या सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता.

Shilpa Tulaskar
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहतामधील आणखी एका अभिनेत्याने सोडली मालिका, सोशल मीडियावरुन दिली माहिती…

तिने मालिकेत बोल्ड सीन दिल्यानंतर आता वेबसीरिजमध्ये रोमान्स करताना शिल्पा दिसणार आहे. त्या वेबसीरिजचे नाव 'हसरत'असे असून नुकताच त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शिल्पा सहसा जास्त अॅक्टिव्ह नसते. तरीही ती तिच्या मालिकेविषयी बरेच अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करते. काही मालिकेतील खास फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

Shilpa Tulaskar
Poonam Pandey: पूनम पांडे 'भयंकर' अवतारात पार्टीत आली, प्रेमाचा 'नशा' काही उतरेना!

कधी ही खास अॅक्टिव्ह नसणाऱ्या शिल्पाच्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली आहे. काल तिने 'हसरतें' वेबसीरिजचा ट्रेलर शेअर केला. हा ट्रेलर पाहून सर्वांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे कारणही तसेच आहे, संपूर्ण ट्रेलर इंटिमेट सीनने खचाखच भरलेला आहे. 'हसरतें' ही सीरिज भावनिक संघर्षावर आधारित आहे. ५ वेगवेगळ्या कथा यात दाखवल्या आहेत.

त्या पाच कथांमध्ये शिल्पाच्या एक कथेचा त्यात समावेश आहे. सीरिजचा ट्रेलर शेअर करताना शिल्पानं एक कॅप्शन दिले आहे, छोटीशी माहितीपू्र्ण नोटही लिहिली आहे. हसरतें ही सीरिज हंगामा वर १२ डिसेंबरला रीलिज होणार आहे.

शिल्पा या वेबसीरिजमध्ये वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर रोमान्स करताना दिसत आहे. शिल्पाने मराठी चित्रपट व मालिकांत काम करुन प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप सोडली. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com