Aryan Khan: आर्यन बॉलिवूडमध्ये येणार, अभिनयातून नाही तर…

बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा लेक आर्यन बॉलिवूडमध्ये अभिनयात पदार्पण न करता, वेगळ्या भूमिकेतून पदार्पण करत आहे.
Aryan Khan
Aryan KhanSaam Tv

Aryan Khan: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या वर्षी कमालीचा चर्चेत होता. आर्यन कार्डिलीया ड्रग्स प्रकरणामुळे त्याच्या व्यावसायिक जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. आर्यन सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय राहून परिवारासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली अन् आर्यन येत्या काळात बॉलिवूड डेब्यू करणार असल्याच्या चर्चांना वेध लागले.

Aryan Khan
Shilpa Tulaskar: मालिकेत रोमान्स तर वेबसीरिजमध्ये दिले इंटीमेट सीन, एका ट्रेलरने चाहत्यांमध्ये कुजबुज

पण त्याने त्यावेळी असे सांगितले होते की, अभिनयात न येता वेगळ्या भूमिकेतून मी येणार आहे. बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स येणे ही काही नवीन बाब नाही. बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्यांच्या मुलांनी थेट अभिनयातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण आर्यनने तसं काही न करता थेट दिग्दर्शकाच्या भूमिकेतूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्या या पदार्पणाने सर्वत्रच त्याचे कौतूक केले जात आहे.

Aryan Khan
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहतामधील आणखी एका अभिनेत्याने सोडली मालिका, सोशल मीडियावरुन दिली माहिती…

त्याच्यावर बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकार मंडळींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यामध्ये आलिया भट्ट, कतरिना कैफ, शनाया कपूर, तारा शर्मा सलुजा, सिकंदर खेर सह मनिषा मल्होत्रा यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सर्व बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत अभिनंदन केले.

Aryan Khan
Poonam Pandey: पूनम पांडे 'भयंकर' अवतारात पार्टीत आली, प्रेमाचा 'नशा' काही उतरेना!

आर्यनने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत दिग्दर्शकाच्या भूमिकेत जात असल्याचे सांगितले. एका बाजूला हातात स्क्रिप्ट असून दुसऱ्या बाजुला 'रेड चिलीज एंटरटेनमेंट'लिहिलेला क्लिपबोर्ड दिसत आहे.

या फोटोवर त्याने कॅप्शन देत लिहिले की, 'लेखन पुर्ण झाले आहे. अॅक्शन करण्यासाठी मी फारच उत्सुक आहे.' त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांच्या प्रतिक्रियेने सर्वांनाच चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

त्याची आई अर्थात गौरी खाननेही त्याच्या पोस्टवर कमेंट केली आहे, ती म्हणते, 'मी आता मुलाचा चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.', तर वडिल शाहरुखने कमेंट केली की, 'व्वा…विचार करत राहा…असाच स्वत:वर विश्वास ठेवत जा… अखेर तुझे स्वप्न पूर्ण झाले आहे, आता हिम्मत…स्वप्न पहिल्यासाठी सर्वात प्रथम तुला शुभेच्छा. हे नेहमीच खास असते…'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com