Vande Bharat Metro: वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लूक व्हायरल; प्रवाशांना सुखावून टाकणारा VIDEO

Vande Bharat Metro Train Video : रोजच्या चाकरमान्यांसाठी वंदे भारत मेट्रो ट्रेन फार मोठं वरदान ठरणार आहे. जुलै महिन्यात या ट्रेनचं पुन्हा ट्रायल सुरू होणार आहे. छोट्या शहरांपासून मोठ्या शहरांमध्ये
Vande Bharat Metro
Vande Bharat MetroSaam TV

भारतात प्रवाशांना सुखकर प्रवास मिळावा यासाठी वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता आणखी सुलभ प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने आता वंदे भारत मेट्रो आणली आहे.

Vande Bharat Metro
Local train bogie derailed at CSMT: मोठी बातमी! CSMT स्थानकात शिरताना लोकलचा डबा घसरला; हार्बर वाहतूक विस्कळीत

ही मेट्रो ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू होईल. मात्र त्या आधी याचे एक ट्रायल घेण्यात आले आहे. त्यावेळीचा एक व्हिडिओ देखील काढण्यात आलाय. हा व्हिडिओ भारतीय रेल्वेतील अजय सिंग यांनी आपल्या ट्वीटर अकाउंवर पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नागरिकांना नोकरीसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात रोजचा प्रवास करावाच लागतो. रोजच्या चाकरमान्यांसाठी ही वंदे भारत मेट्रो ट्रेन फार मोठं वरदान ठरणार आहे. जुलै महिन्यात या ट्रेनचं पुन्हा ट्रायल सुरू होणार आहे. या ट्रेनमुळे पहिल्याच टप्प्यात १२४ शहरांमध्ये यासाठी रेल्वे स्थानक असणार आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अगदी वंदे भारत ट्रेनप्रमाणेच वंदे भारत मेट्रो ट्रेनचा लूक आहे. ट्रेनला आतमध्ये निळा रंग देण्यात आला आहे. यामध्ये स्वच्छतागृह देखील आहेत. तसेच चार्जिंग पॉइंट्स देखील देण्यात आले आहेत. उभ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ग्रॅब हॅन्ड्रेल्सही बसवण्यात आले आहेत.

वंदे भारत मेट्रो ट्रेन कपूरथला येथील रेल्वे कारखान्यात तयार करण्यात आली. यामध्ये ४, ८ किंवा १२ ते १६ कोच आहेत. वंदे भारत मेट्रो ट्रेनने १०० ते १५० किमी अंतर कापता येणार आहे.

वंदे भारत मेट्रो ट्रेन लखनौ-कानपूर, आग्रा-मथुरा आणि तिरुपती-चेन्नई या मार्गांवर धावणार आहे. छोट्या शहरांपासून मोठ्या शहरांमध्ये झटपट पोहचता यावे यासाठी वंदे भारत मेट्रो काम करणार आहे.

Vande Bharat Metro
Vande Bharat Train: भाविकांसाठी खुशखबर! लवकरच शेगावसाठी धावणार ‘वंदे भारत ट्रेन’, पाहा कसा असेल मार्ग?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com