Flora Saini
Flora SainiSaam TV

Flora Saini: जबडा तुटे पर्यंत 'स्त्री' फेम अभिनेत्रीला प्रियकराकडून मारहाण; श्रद्धा वालकर प्रमाणे हत्येचा प्रयत्न

प्रेमात फ्लोरा इतकी वेडी झाली होती की, तिने तिचं राहतं घर सोडलं.

Flora Saini: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर आता एका अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील भयावह प्रसंग चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. गंदी बात फेम अभिनेत्री (Actress) फ्लोरा सैनीने बॉयफ्रेंडने तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. मीटू दरम्यान तिने तिच्या आयुष्यातील सर्वात दु:खद काळ चाहत्यांबरोबर शेअर केला. (Latest Marathi News)

आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी

अभिनेत्रीने सांगितले की, तिचा बॉयफ्रेंड सतत तिच्यावर चिडचिड करायचा. शुल्लक कारणावारून त्यांच्यात वाद झाल्यावर तिला मारहाण करायचा. या त्रासाला फ्लोरा सैनी कंटाळली होती. जर मला सोडून जाशील तर मी तुझ्या आई-बाबांचा जीव घेईल, अशी धमकी त्याने फ्लोराला दिली होती. या धमक्यांमुळे ती जिवंतपणी मरण यातना सहन करत असल्याचे ती म्हणाली.

Flora Saini
Controversial Movies: २०२२ मधील बॉलिवूडचे सर्वात चर्चित वाद आणि चित्रपट, वाचा सविस्तर…

प्रियकराने सांगितले प्रेम सिद्ध करायला

एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत फ्लोराने सांगितल्या नुसार, तिचा प्रियकर एक चित्रपट (Movie) निर्माता होता. त्याच्या प्रेमात फ्लोरा इतकी वेडी झाली होती की, तिने तिचं राहतं घर सोडलं. तसेच आई बाबांच्या विरोधात जाऊन प्रियकराबरोबर राहायला सुरूवात केली. तिने त्याच्यासाठी एवढं केलं तरी त्याने तिला एक दिवस तुझं प्रेम सिद्ध करून दाखव असे सांगितले होते.

Flora Saini
Ashok Chavan's Daughter Enters Politics : अशोक चव्हाणांची कन्या राजकारणात, पाहा सविस्तर बातमी

फोन घेत खोलीत ठेवले डांबून

फ्लोराने सांगितले की, सुरूवातीला तिचा प्रियकर खुप चांगला होता. तो तिच्या आयुष्यातील प्रत्येक सु:ख दुख:त तिची साथ देत होता. मात्र नंतर त्याचा स्वभाव फार रागीट झाला. कोणत्याही गोष्टीवरून त्यांच्यात भांडणे होऊ लागली. भाडणात फ्लोराला नेहमीच मारहाण होत होती. एकदा त्याने तिला बेदम मारहाण करून एका खोलीत डांबून ठेवले होते. तसेच तिच्याकडचा फोनही काढून घेतला होता.

जबडा तुटेपर्यंत मारहाण

एक दिवस या दोघांमधले वाद जास्त विकोपाला गेले. त्यामुळे रागात प्रियकराने फ्लोराला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात तिचा चेहरा पूर्ण सुजला होता. तरी देखील जबडा तुटेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. आपला जीव धोक्यात आहे असे लक्षात आल्यावर अभिनेत्रीने तेथून पळ काढला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com