ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजच्या युगात अनेक लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत.
लठ्ठपणामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
तुमचे वजन नेमकं कोणत्या करणांमुळे वाढते हे जाणून घेणे गरजेचे आहे.
जंक फूड आणि तेलकट खाण्याच्या अतिसेवनामुळे शरीरात भरपूर कॅलरीज वाढतात आणि यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते.
एका जागी तासनतास बसून राहील्यामुळे शरीरामध्ये फॅट्स साठून राहातात आणि त्यामुळे लठ्ठपणा सरखे समस्या होतात.
नियमीत वेळ झोप नाही घेतल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
आयुष्यात तणाव जास्त वाढल्यामुळे कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन शरीरात वाढते ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़