Arjun Kapoor On Malaika Arora's Pregnancy Rumours Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor Statement: मलायकाच्या प्रेग्नंसीची अफवा पसरली, अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात गेली; रागारागाने म्हणाला, काहीही...

Arjun Kapoor And Malaika Arora's News: गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उडालेल्या अफवांप्रमाणे यावेळी देखील पुन्हा एकदा सोशल मीडियावर मलायका प्रेग्नेंट असल्याच्या अफवा सुरु झाल्या आहेत.

Chetan Bodke

Arjun Kapoor On Malaika Arora's Pregnancy Rumours: बॉलिवूडचे सर्वात चर्चेत असणारे कलप म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. गेल्या अनेक वर्षांपासून यांच्या रिलेशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. कधी रिलेशनवरून तर कधी वयाचं कारण देत नेटकरी या जोडीला कमालीचे ट्रोल करतात. आता मलायकाला प्रेग्नेंसीवरून ट्रोल केले जात आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये देखील मलायका प्रेग्नेंट असल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर मलायका प्रेग्नेंट असल्याची अफवा सुरु झाली आहे. यावर अर्जुनने आता प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुनने नेटकऱ्यांना एका मुलाखतीच्या माध्यमातून चांगलेच खडसावले आहे.

बॉलिवूड बबल या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन कपूरने ट्रोलर्सला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. तो म्हणतो, “समाजात नकारात्मकता पसरवणे खूपच सोपे आहे. अनेकदा सलग एकच गोष्ट लोकांच्या समोर आल्या की ते त्यावर गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्या मागील सत्य पडताळतही नाहीत. त्यामुळे काहीही लिहिण्याआधी कृपया विचार करूनच लिहीत जा. आम्ही सेलिब्रिटी आहोत. आमचे खासगी आयुष्य हे कधीच खासगीमध्ये नसते. मला माहित आहे की, आम्ही ज्या व्यवसायात आहोत, त्या ठिकाणी या अफवा पसरणे स्वाभाविक आहे.”

पुढे मुलाखतीत अर्जुन कपूर म्हणतो, “आमच्या बातम्या सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचवतात यावर आम्ही बऱ्याचदा माध्यमांवर विश्वास ठेवतो. आम्ही देखील माणसं आहोत हे तुम्ही समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच काहीही लिहिण्यापूर्वी एकदा आमच्याकडूनही त्याबद्दल खात्री करून घ्या. माध्यमांनी किमान त्या बातमीची पुष्टी करून घेतली असती, तर खूप चांगलं झालं असतं. मी ती प्रतिक्रिया सहजच दिली होती. ती बातमी एकदा तपासून पाहणे खूप गरजेचे होते. तुम्ही स्वतःहून कोणतीही बातमी लिहू नये.” (Bollywood News)

अर्जुन आणि मलायकाने २०१९ मध्ये पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्यातील नात्याची अधिकृत घोषणा केली होती. जरी त्यापूर्वी ते एकमेकांना डेट करत असले तरी त्यांच्यात जवळपास १२ वर्षांचे अंतर आहे. मलायका अर्जुनपेक्षा वयाने मोठी असल्यामुळे अनेकदा नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करत असतात. अर्जुन ३७ वर्षांचा आहे तर मलायका ४९ वर्षांची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

SCROLL FOR NEXT