Arbaz-Nikki SAAM TV
मनोरंजन बातम्या

Arbaz-Nikki : निक्कीमुळे गेम खराब... अरबाजच्या वडिलांचं नेमकं मत काय?

Arbaz Father Reaction On Nikki : गेल्या आठवड्यात अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर आता अरबाजच्या वडिलांनी निक्की विषयीचे आपले मत एका मुलाखतीत मांडले आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीची (Bigg Boss Marathi 5) चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात आता 'महा चक्रव्यूह' टास्क होताना पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण ट्रॉफी जिंकण्यासाठी लढतांना दिसत आहे. आता कोण घराबाहेर जाणार आणि कोण बिग बॉसची ट्रॉफी उचलणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. गेल्या आठवड्यात अरबाज घरातून बाहेर पडला. त्याच्या जाण्यामुळे निक्कीला खूप वाईट वाटले. आता अरबाज (Arbaz Patel) बाहेर आल्यानंतर तो अनेक मुलाखती देताना दिसत आहे. तसेच त्याच्या वडिलांनी देखील मिडियाला मुलाखत दिली आहे.

अरबाजच्या वडिलांनी (Arbaz Father ) दिलेल्या एका मिडिया मुलाखतीत ते निक्की विषयी बोले. त्यांना अरबाज आणि निक्कीच्या नात्यांवर आपले मत मांडले. ते म्हणाले की, "एका घरात दोन महिने राहिल्यावर मैत्री होते. त्या दोन माणसांमध्ये छान बॉण्डिंग होते. तसेच एकमेकांची सवय लागते. जर ती व्यक्ती अचानक घरातून बाहेर गेली तर त्रास होणारचं. वाईट वाटणं साहजिक आहे. तो येताना निक्की खूप रडली, तिच्या त्या भावना खऱ्या होत्या. शेवटी ते म्हणाले की, मैत्री आणि लव्ह अँगल यात फरक असतो. "

पुढे ते म्हणाले की, "मला ही आधी निक्कीचा खूप राग यायचा. असे वाटायचे की, अरबाज हे चूकीचं करत आणि निक्कीमुळे (Nikki Tamboli) गेम खराब होत आहे. निक्की अरबाजचा फायदा घेत आहे. पण जेव्हा मी अरबाजशी बोलो तेव्हा कळलं की निक्की आणि त्याची बॉण्डिंग खूप खास आहे. अरबाज घराबाहेर आल्यावर बोला की, पप्पा जसं टिव्हीवर दिसतं तस नसतं. तुम्हाला एक बाजू दिसते. पप्पा तुम्ही जशी माझी काळजी घेता तशी निक्कीने घरात माझी काळजी घेतली. चांगलं -वाईट बोलायची. गेम प्लॅनिंग करायची." तसेच अरबाजने सांगितले की, "जेव्हा त्यांच भांडण झालं तेव्हा निक्कीने स्वत:हून माफी सुद्धा मागितली. "

या आधी दिलेल्या एका मिडिया मुलाखतीत अरबाजाच्या वडिलांनी सांगितले की, "अरबाजने शोमध्ये स्वतः कमिटेड असल्याचे सांगितले आणि त्यानंतर त्याची निक्कीबरोबर जवळीकता दिसत आहे. असं अरबाजनं करायला नको." अशी वडिलांनी प्रतिक्रिया दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT