Arbaz Patel : बिग बॉसच्या घरात शिवरायांचा जयजयकार करताना अरबाज गप्प का होता? घराबाहेर पडताच सांगितलं कारण...

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरातून गेल्या आठवड्यात अरबाज पटेल बाहेर पडला. तो घरामध्ये असताना घडलेल्या एका घटनेसंबंधी त्याने खुलासा केला आहे. ज्यामुळे त्याच्यावर चाहते नाराज झाले होते.
Bigg Boss Marathi
Arbaz PatelSAAM TV
Published On

बिग बॉस मराठी आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. प्रत्येकजण फिनालेला जाण्यासाठी जबरदस्त खेळ खेळताना दिसत आहे. आता बिग बॉस एकूण आठ सदस्य आहेत. कोण घराबाहेर जाणार आणि कोणाला तिकीट टू फिनाले मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

बिग बॉसचा खेळ दिवसेंदिवस रंजक होत जात आहे. गेल्या आठवड्यात अरबाज पटेल घराबाहेर गेला. त्याच्या जाण्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का मिळाला. अरबाज जाण्याचे सर्वात जास्त दुःख निक्की झाल्याचे पाहायला मिळाले. अरबाजला कमी मते मिळाल्यामुळे त्याला घराबाहेर जावे लागले. प्रेक्षकांना त्याचा खेळ फारसा आवडला नव्हता. बिग बॉस घरातून पहिल्यांदा पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर पडले. त्यामुळे पुरुषोत्तम दादांनी घरातून बाहेर पडताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. या घटनेवरून अरबाजला ट्रोल करण्यात आलं होते. कारण त्यांनी महाराजांचा जयजयकार केला नव्हता.

सध्या अरबाज अनेक मिडिया मुलाखती देत आहेत. त्यात एका मिडिया मुलाखतीत त्याला विचारले की, जेव्हा पुरुषोत्तम दादांनी घरातून बाहेर पडताना महाराजांचा जयजयकार केला तेव्हा तू तो जयजयकार का केला नाही? यावर अरबाजने उत्तर दिले की, "खरतरं मला या घटनेची कल्पना नाही. मी स्वतः संभाजीनगरमध्ये राहतो. ही जागा ऐतिहासिक आहे. आपण आज शिवाजी महाराजांमुळेच इथे आहोत. मी स्वतः पुरुषोत्तम दादांना नॉमिनेट केलं होतं त्यामुळे मी कसल्यातरी विचारात होतो. त्यामुळे ते राहून गेलं. माझा कोणताही धर्मिकदृष्ट्या वितार नाही. जर तसा विचार असता तर मी कधीच बिग बॉस मराठीमध्ये आलोच नसतो. मी धर्माबाबत खूप संवेदनशील आहे. पण तरी सुद्धा कोणाला याच वाईट वाटल असेल तर मी सगळ्यांची माफी मागतो." अशा शब्दात अरबाजने आपले मत मांडले.

Bigg Boss Marathi
Tripti Dimri : 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरीचा 'मेरे मेहबूब' गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, तौबा तौबा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com