Case Register Against Annapoorani Movie Team Saam Tv
मनोरंजन बातम्या

Annapoorani Movie: 'अन्नपूर्णानी' चित्रपटाच्या टीमची अडचण वाढली, नयनतारासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

Case Register Against Annapoorani Movie Team: गुरूवारी या चित्रपटाच्या निर्मात्यांसह आठ जणांविरोधात मिरा भाईंदर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या आठही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Priya More

महेंद्र वानखेडे, मिरा भाईंदर

Case Register Against Annapoorani Movie Director:

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा तिच्या (Nayantara) 'अन्नपूर्णानी' चित्रपटाटामुळे (Annapoorani Movie) अडचणीत आली आहे. या चित्रपटामध्ये हिंदू धर्माच्या भावना भडकवणारी दृश्य आणि विधाने वापरली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नयनतारा आणि चित्रपटाच्या निर्मात्यांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी या चित्रपटाच्या निर्मात्यांसह आठ जणांविरोधात मिरा भाईंदर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या आठही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेत्री नयनताराच्या नावाचा देखील समावेश आहे.

ओटोटीवर प्रदर्शित झालेला 'अन्नपूर्णानी' या चित्रपटाच्या निर्मात्यांसह सात जणांविरोधात पहिलाच गुन्हा महाराष्ट्रामध्ये दाखल करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर येथील हिंदू संघटनेचे कार्यकर्ते अरुप मुखर्जी यांनी नया नगर पोलिस ठाण्यामध्ये या चित्रपटाच्या टीमविरोधात तक्रार दाखल केली होती. या चित्रपटामध्ये लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नया नगर पोलिसांनी मुखर्जी यांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री नयनतारासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

अरुप मुखर्जी यांनी या चित्रपटात हिंदू समाजाच्या धार्मिक भावना भडकवणारी दृश्य आणि विधाने वापरल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. इतिहासाचा कोणताही पुरावा चित्रपटाचे लेखक, डायरेक्टर, प्रोड्युसर यांच्याकडे नसताना त्यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान या चित्रपटामध्ये वापरले आहेत. तसेच लव जिहाद या विषयाला जाणून बुजून या चित्रपटामध्ये प्रोत्साहित केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या चित्रपटातील दृश्यांमुळे सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवून अन्नपुर्णानी या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश कृष्णा, अभिनेत्री नयनतारा, अभिनेता जय साठयाराज, निर्माता जतीन सेठी, आर रवींद्रन, पुनीत गोयंका तसेच झी स्टुडिओचे चिफ बिझनेस ऑफिसर शारिक पटेल, ट्रेन्डेन्ट आर्ट, तसेच नेटफ्लिक्स इंडीया हेड मोनिका शेरगील यांच्याविरोधात नया नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरोधात भादंवि कलम १५३ ए, २९५ ए, ५०५-२, आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणाविरोधात कारवाई करण्यात आली नाही.

याप्रकरणी दुसरी तक्रार हिंदू आयटी सेलचे संस्थापक रमेश सोलंकी यांनी दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या चित्रपटात प्रभू रामाचा अपमान करण्यात आला असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हा चित्रपट जाणीवपूर्वक प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप रमेश सोलंकी यांनी केला आहे. या निषेधानंतर, झी स्टुडिओने एक निवेदन जारी केले की, 'त्यांचा हेतू धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. या चित्रपटातील दृश्य संपादित केले जाईल आणि आवश्यक बदल होईपर्यंत चित्रपट Netflix वरून काढून टाकला जाईल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT