बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) लवकरच बहुप्रतीक्षित 'मैं अटल हूं' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामुळे पंकज त्रिपाठी चर्चेत असून तो सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटेलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. पंकज त्रिपाठी या चित्रपटामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टर, टीझर आणि ट्रेलरनंतर आता या चित्रपटातील 'हिंदू तन-मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय' हे नवं गाणं रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.
'मैं अटल हूं' हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केले आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटातील ‘हिंदू तन-मन’ हे नेत्रदीपक गाणं लाँच करण्यात आले आहे. हे गाणं पंकज त्रिपाठीच्या चाहत्यांना खूप आवडते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘हिंदू तन-मन’ या कवितेवर हे गाणं तयार करण्यात आले आहे. गाण्याचे बोल स्वतः अटलबिहारी वाजपेयी यांनी लिहिले आहेत. हे गाणं प्रसिद्ध गायक कैलाश खैर यांनी गायलं आहे. या गाण्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
पंकज त्रिपाठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये या गाण्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. पंकज त्रिपाठीने या पोस्टला कॅप्शन देत लिहिले की, 'श्री अटलबिहारी वाजपेयीजी यांची कविता जी तुम्ही प्रेम दिले आहे. ही आहे हिंदू शरीर आणि मनाची मधुर शैली! हे गाणं आज रिलीज झाले आहे. मैं अटल हूं 19 चित्रपटगृहांमध्ये. जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होईल.'
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे साहित्यावर नितांत प्रेम होते आणि त्यांनी अनेक कविताही लिहिल्या होत्या. आता त्यांच्या ‘हिंदू तन-मन’ कवितावर आधारित गाण्याला युट्यूबवर चांगली पसंती मिळत आहे. सध्या या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान,'मैं अटल हूं' हाचित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा ऋषी विरमणी आणि रवी जाधव यांनी संयुक्तपणे लिहिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.