Merry Christmas Twitter Review: विजय सेतुपतीच्या अभिनयाचे कौतुक, पण नेटिझन्सनी 'मेरी ख्रिसमस'मध्ये काढल्या काही उणिवा

Merry Christmas Movie Released: विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये मोठी गर्दी करत आहेत.
Merry Christmas Movie Update
Merry Christmas Movie UpdateSaam Tv

Merry Christmas Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaife) आणि साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा बहुप्रतीक्षित 'मेरी ख्रिसमस' चित्रपट (Merry Christmas Movie) अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विजय सेतुपती आपल्या अप्रतिम अभिनयामुळे चर्चेत आला आहे.

विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये मोठी गर्दी करत आहेत. महत्वाचे म्हणजे पहिला शो पाहिल्यानंतरच नेटिझन्स ट्विटरवर प्रतिक्रिया देत विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांच्या अभिनयाचे कौतुक करू लागले आहेत.

'मेरी ख्रिसमस' चित्रपट रिलीज झाल्यानंतर सध्या ट्विटरवर प्रेक्षक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या चित्रपटाबाबत आतापर्यंत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कुणाला विजय सेतुपतीचा अभिनय आवडला आहे. चित्रपटाचा सस्पेन्स कोणाची तरी मनं जिंकतोय. तर दुसरीकडे अनेकजण चित्रपटातील उणिवाही मांडतांना दिसत आहेत. या चित्रपटाबद्दल ट्विटरवर युजर्सचे काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

विजय सेतुपतीच्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर 'मेरी ख्रिसमस' पाहण्यासाठी अनेक जण थिएटरमध्ये पोहोचले आहेत. पण चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ट्विटरवरही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. चित्रपटातील विजय सेतुपतीच्या अभिनयाशिवाय प्रत्येक गोष्टीत काही प्रेक्षकांना उणिवा जाणवताना दिसत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा चित्रपट ख्रिसमसलाच प्रदर्शित व्हायला हवा होता, असे काहींचे म्हणणे आहे. याशिवाय, ट्विटर युजर्स चित्रपटाच्या पूर्वार्धाबद्दल खूप बोलतांना दिसत आहेत. सोशल मीडियावर यूजर्सचे ट्वीट खूप व्हायरल होत आहेत.

दरम्यान, कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये फारशी कमाई केलेली नाही. तरीही असा अंदाज वर्तवला जात आहे की, 'मेरी ख्रिसमस' पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 10 कोटींचा टप्पा पार करेल. 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. कतरिना कैफ या चित्रपटाआधी 'टायगर 3'मध्ये दिसली. या चित्रपटात कतरिनासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. तर त्याआधी ती शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसली होती.

Merry Christmas Movie Update
Main Atal Hoon: 'हिंदू तन-मन, हिंदू जीवन...', पंकज त्रिपाठीच्या 'मैं अटल हूं'मधील नवं गाणं रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com