Pushpa 2: The Rule Movie Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tripti Dimri In Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये समांथा रुथ प्रभू दिसणार नाही ?, अल्लू अर्जुनसोबत 'नॅशनल क्रश' चित्रपट गाजवणार

Pushpa 2 The Rule Movie Update: बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी 'ॲनिमल' चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आली होती. या चित्रपटापासून तिच्या प्रसिद्धीत तुफान वाढ झाली आहे. अशातच आता तृप्तीच्या पदरी आणखी एक नवा प्रोजेक्ट आलेला आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी 'ॲनिमल' चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आली होती. या चित्रपटापासून तिच्या प्रसिद्धीत तुफान वाढ झाली आहे. या चित्रपटानंतर तृप्तीच्या पदरी अनेक नवनवे चित्रपट आलेले आहेत. अशातच आता तृप्तीच्या पदरी आणखी एक नवा प्रोजेक्ट आलेला आहे. अल्लू अर्जुनच्या बहुप्रतिक्षित 'पुष्पा २: द रुल' चित्रपटात तृप्ती डिमरी दिसणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. या चित्रपटात ती समांथा प्रभुची जागा घेणार असल्याचं बोललं जात आहे.

तेलुगू ३६० च्या माहितीनुसार, तृप्ती डिमरी 'पुष्पा २: द रुल' चित्रपटाचा भाग होणार आहे. या चित्रपटामध्ये ती अल्लू अर्जुनसोबत एकत्र डान्स करणार आहे. मुख्य गोष्ट म्हणजे, तृप्ती डिमरी समांथा रुथची जागा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तृप्ती डिमरी कोणत्या गाण्यात दिसणार ? अशी सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.समांथाने 'पुष्पा: द राईज'मध्ये, 'ऊ अंटावा' या आयटम साँगमध्ये तिने अफलातून डान्स केलेला आहे. प्रेक्षकांनी तिच्या ह्या डान्सचे जोरदार कौतुक केले होते. आतापर्यंत 'पुष्पा २: द रुल'मधील एकच गाणं रिलीज झालेले आहे.

‘पुष्पा २’ चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.. ५०० कोटींच्या बजेटमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २’चा समावेश असणार आहे. ‘पुष्पा’प्रमाणेच ‘पुष्पा २: द रुल’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल, यामध्ये शंका नाही. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदानाही स्क्रीन शेअर करणार आहे. तर फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

Tuljapur Tulja Bhavani Mandir : तुळजा भवानी मंदिराचा गाभारा पाडणार? मंदिर जीर्णोद्धावरुन तुळजापुरात राडा

SCROLL FOR NEXT