Dharma- The AI Story ची रिलीज डेट जाहीर, चित्रपटात AI च्या जाळ्यात गुरफटलेल्या बापाचा संघर्ष दिसणार

Dharma- The AI Story Release Date : AI तंत्रज्ञानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या तंत्रज्ञानावर आधारित लवकरच मराठमोळा चित्रपट येणार आहे. अभिनेता पुष्कर जोग दिग्दर्शित Dharma- The AI Story चित्रपट येत्या सप्टेंबर २०२४ मध्ये रिलीज होणार आहे.
Dharma- The AI Story ची रिलीज डेट जाहीर, चित्रपटात AI च्या जाळ्यात गुरफटलेल्या बापाचा संघर्ष दिसणार
Dharma- The AI Story Release DateSaam Tv

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) ची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. अनेक जण या तंत्रज्ञानाचं कौतुक करतात तर या तंत्रज्ञानावर टीका टीप्पणीही करतात. लहानांपासून थोऱ्या मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या तोंडून आपल्याला AI हे नाव ऐकायला येते. आता याच AI वर आधारित नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुष्कर जोगने या चित्रपटाची घोषणा करत चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात केलेली होती. अशातच आता दिग्दर्शकांकडून चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली असून चित्रपटाचा नवा टीझर रिलीज केलेला आहे.

Dharma- The AI Story ची रिलीज डेट जाहीर, चित्रपटात AI च्या जाळ्यात गुरफटलेल्या बापाचा संघर्ष दिसणार
Kalki 2898 AD Teaser : 'कल्की'चा नवा टीझर रिलीज, चित्रपटात दिसणार धमाकेदार ॲक्शन आणि AI ची किमया

या प्रोमोमध्ये Artificial Intelligence, Coding, Cyber Crime, Deepfake सह असे अनेक मुद्दे पाहायला मिळत आहे. चित्रपटामध्ये प्रेक्षकांना AI च्या जाळ्यात गुरफटून गेलेल्या एका बापाची झटापट पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक पुष्कर जोगने हा टीझर शेअर करताना, "AI च्या जाळ्यात गुरफटून गेलेल्या एका बापाची झटापट… Dharma- The AI Story | २७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला" असं कॅप्शन दिलेलं आहे. सध्या जगभरात AI ची जोरदार चर्चा सुरू आहे. अनोखं कथानक प्रेक्षकांना फारच भावला असून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता आहे.

बियु प्रॉडक्शन निर्मित 'धर्मा- दि एआय स्टोरी'चे दिग्दर्शन पुष्कर जोग करणार असून चित्रपटाची निर्मिती तेजल पिंपळे करणार आहे. पुष्कर जोग कायमच मराठी सिनेसृष्टीला हटके विषय देत असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाचे कथानक नाविन्यपूर्ण असते.

त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट कथानक पाहायला मिळणार, हे नक्की. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत पुष्कर जोगसोबत दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर दिसणार आहे.

आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी आपण फक्त सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. आता हाच विषय थेट आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने 'धर्मा- दि एआय स्टोरी' विषयीची उत्सुकता आता वाढलेली दिसत आहे. हा चित्रपट येत्या २७ सप्टेंबर २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Dharma- The AI Story ची रिलीज डेट जाहीर, चित्रपटात AI च्या जाळ्यात गुरफटलेल्या बापाचा संघर्ष दिसणार
Shah Rukh Khan Discharged : किंग खान इज बॅक, शाहरूख खानच्या सुधारणा; फायनल पाहण्यासाठी मैदानात येणार का ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com