Ananya Pandey Saam tv
मनोरंजन बातम्या

Ananya Pandey:'साई पल्लवीशी तुझी तुलना होऊच शकत नाही'; भरतनाट्यममुळे अनन्या पांडे ट्रोल, मिम्सचा पाऊस

Ananya Pandey: ‘चांद मेरा दिल’ चित्रपटातील अनन्या पांडेच्या भरतनाट्यम सीनवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. नेटकऱ्यांनी या डान्सला “रोबोटिक” म्हणत अभिनेत्रीची साई पल्लवीशी तुलना केली.

Shruti Vilas Kadam

Ananya Pandey: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'चांद मेरा दिल' (Chand Mera Dil) या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिच्या अभिनयापेक्षा चित्रपटातील एका भरतनाट्यम नृत्यप्रसंगामुळे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसत आहे. चित्रपटातील एक छोटी क्लिप सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल झाली असून, त्यावरून प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये अनन्या पारंपरिक भारतीय वेशभूषेत भरतनाट्यम आणि contemporary डान्सचा मिलाफ सादर करताना दिसत आहे. मात्र अनेक सोशल मीडिया नेटकऱ्यांनी तिचे डान्सची खिल्ली उडवली असून त्याचे मिम्स तयार केले आहेत. काहींनी तिच्या डान्सला 'रोबोटिक म्हटले आहे. तर काहींनी हा डान्स भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यप्रकाराचा अपमान असल्याचे म्हटले.

अनन्या पांडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल

'चांद मेरा दिल' मधील तिचा भरतनाट्यम पाहून अनन्या पांडेला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, "मी १० वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय नृत्याचा अभ्यास केला आहे आणि हा डान्स खरोखरच अत्यंत खराब आहे. आणखी एकाने लिहिले हा भरतनाट्यमचा निव्वळ अपमान आहे."

साई पल्लवीशी तुलना

रेडिट (Reddit) वरील एका नेटकऱ्याने कमेंट केली, "ती कोणत्या डान्सचा प्रयत्न करत आहे हे मला माहित नाही, पण हे नक्कीच भरतनाट्यम नाही." दुसऱ्या एका नेटकऱ्याने तिची तुलना साई पल्लवीशी केली आणि लिहिले, "अनन्याचे डान्स पाहताना मला साई पल्लवीच्या अप्रतिम डान्सची आठवण झाली. यावरून हेच ​​दिसून येते की, 'नेपो किड्स'ना (nepotism kids) सर्व काही किती सहजपणे मिळते." आणखी एकाने लिहिले, साई पल्लवीशी तुझी तुलना होऊच शकत नाही'

'चांद मेरा दिल' बद्दल

'चांद मेरा दिल' या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक सोनी यांनी केले आहे; यापूर्वी त्यांनी 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट आरव आणि चांदनी यांच्या लव्हस्टोरी भोवती फिरते. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली करण जोहर, आदर पूनावाला, अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा आणि मारिज्के डिसूझा यांनी केली आहे. 'चांद मेरा दिल' हा चित्रपट २२ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT