Ek Din Review: साई पल्लवी आणि जुनैद खान 'एक दिन' चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला? वाचा खास रिव्ह्यू

Ek Din Review: साई पल्लवी आणि जुनैद खानच्या ‘एक दिन’ चित्रपटाला मिक्स प्रतिसाद मिळत आहे. कथा रोमँटिक असली तरी ती ओरिजिनल नसल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.
Ek Din Review
Ek Din ReviewSaam Tv
Published On

Ek Din Review: साई पल्लवी आणि जुनैद खान यांची प्रमुख भूमिका असलेला 'एक दिन' हा रोमँटिक चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर या चित्रपटाला संमिश्र रिव्ह्यू मिळताना दिसत आहेत. काही प्रेक्षकांनी चित्रपटाचं कौतुक केलं असलं तरी अनेकांनी कथेत नविन काहीच नसल्याचे पहायला मिळत आहे.

हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या थाई चित्रपट ‘One Day’चा हिंदी रीमेक असल्यामुळे त्यात नवीन काहीच नाही, अशी प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिली आहे. काही नेटकऱ्यांनी “ही कथा जवळपास तशीच उचलली आहे” असं म्हणत चित्रपटावर टीका केली, तर काहींनी “एकदाच पाहण्यासारखा चित्रपट” असा रिव्ह्यू दिला आहे.

Ek Din Review
Marathi Actress: 'बायबल के बारे में बात करनी…'; बोरवलीच्या बाजारात अभिनेत्रीसोबत घडला संशयास्पद प्रकार, VIDEO व्हायरल

मात्र, चित्रपटातील साई पल्लवी आणि जुनैद खान यांची केमिस्ट्री अनेकांना आवडली आहे. विशेषतः साई पल्लवीच्या अभिनयाचं कौतुक होत असून, तिच्या कामामुळे चित्रपटाला ताकद मिळाली असल्याचे नेटकरी बोलत आहेत.

चित्रपटाची कथा दिनेश आणि मीरा या दोन पात्रांभोवती फिरते. एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या दिनेशला आपल्या सहकर्मी मीरावर प्रेम असतं. एका अपघातानंतर मीराची स्मृती तात्पुरती हरवते आणि त्यानंतर दोघे एक दिवस एकत्र घालवतात, अशी या चित्रपटाची कथा आहे.

Ek Din Review
Amruta Fadnavis Naman Tula Song: महाराष्ट्र दिनी शिवरायांना अभिवादन; अमृता फडणवीसांचं 'नमन तुला' गाणं रिलीज

काही प्रेक्षकांनी या चित्रपटाला “नो गन्स, ओन्ली रोजेस” असे रिव्ह्यू दिले आहे. चित्रपटात अॅक्शन किंवा मोठे ट्विस्ट नसून, एक सरळ आणि इमोशनल स्टोरी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पण, चित्रपटाचा धीमा वेग आणि कमकुवत स्क्रीनप्ले यामुळे काही ठिकाणी प्रेक्षकांना चित्रपट बघताना कंटाळा येतो असे मत देखील अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. तर, साध्या प्रेमकथा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एकदा पाहण्यासारखा असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com