Amruta Fadnavis Naman Tula Song: महाराष्ट्र दिनी शिवरायांना अभिवादन; अमृता फडणवीसांचं 'नमन तुला' गाणं रिलीज

Amruta Fadnavis Naman Tula Song: महाराष्ट्र दिनानिमित्त अमृता फडणवीस यांचं ‘नमन तुला’ गाणं रिलीज. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणाऱ्या या गीतात रितेश देशमुखची झलक पाहायला मिळते.
Amruta Fadnavis Naman Tula Song
Amruta Fadnavis Naman Tula SongSaam Tv
Published On

Amruta Fadnavis Naman Tula Song: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत गायिका अमृता फडणवीस यांचं ‘नमन तुला’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणाऱ्या या गौरवगीताला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

भूषण कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत या गाण्यात महाराष्ट्राच्या इतिहासाचा, पराक्रमाचा आणि अभिमानाचा गौरव करण्यात आला आहे. ‘नमन तुला’ हे केवळ गाणं नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असल्याची भावना या गीतातून व्यक्त होते. विशेष म्हणजे या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अभिनेता रितेश देशमुख याचीही झलक पाहायला मिळते, ज्यामुळे गाण्याला अधिक आकर्षण प्राप्त झालं आहे.

Amruta Fadnavis Naman Tula Song
Marathi Actress: 'बायबल के बारे में बात करनी…'; बोरवलीच्या बाजारात अभिनेत्रीसोबत घडला संशयास्पद प्रकार, VIDEO व्हायरल

या गाण्याचं दिग्दर्शन शक्ती हसीजा यांनी केलं असून, नचिकेत बर्वे यांनी वेशभूषा डिझाइन केली आहे. पारंपारिक महाराष्ट्रीय लूकमध्ये अमृता फडणवीस अत्यंत देखण्या दिसत असून, गाण्याच्या दृश्यांमध्ये महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले आणि संस्कृतीचे दर्शन घडते. कोरिओग्राफी पवन बॉब यांनी केली असून, त्यातून गाण्याची भव्यता अधिक खुलून येते.

Amruta Fadnavis Naman Tula Song
Raja Shivaji Review: रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' थिएटरमध्ये पास की फेल; प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

संगीतकार अनु मलिक यांनी या गीताला संगीत दिलं आहे. पारंपारिक पोवाडा शैली आणि आधुनिक संगीत यांचा सुंदर मेळ या गाण्यात पाहायला मिळतो, ज्यामुळे हे गीत तरुणांनाही भावेल असा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या शेवटी रितेश देशमुखची दिमाखदार एन्ट्री होते. अमृता फडणवीस आणि रितेश देशमुख शिवाजी महाराजांना नमन करुन गाण्याची सांगता करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com