Anant- Radhika Wedding Live Perform Bollywood Singer  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Wedding News : राधिका- अनंत अंबानी यांच्या लग्नात सजणार सुरांची मैफल, बॉलिवूडचे दिग्गज गायक करणार लाईव्ह परफॉर्मन्स

Anant- Radhika Wedding Live Perform Bollywood Singer : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामध्ये कोण गायक परफॉर्मन्स करणार याचीही यादी समोर आली आहे.

Chetan Bodke

सोशल मीडियासह सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची चर्चा सुरू आहे. आधी प्री-वेडिंग आणि आता वेडिंग सोहळ्यातील कार्यक्रमांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. येत्या १२ जुलै रोजी अनंत- राधिका मुंबईमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना २ जुलैपासून सुरूवात झाली आहे. संगीत सोहळ्यासाठी हॉलिवूडसह अनेक बॉलिवूड सिंगरने सोहळ्याला उपस्थिती लावली होती. आता लग्नालाही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थिती लावणार आहेत. लग्नासाठी हिप हॉप साँग वैगेरे नाही तर, भक्ती गीत किंवा श्लोक पठण केले जाणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका-अनंतच्या लग्नामध्ये भारतातील प्रसिद्ध गायक परफॉर्मन्स सादर करणार आहेत. लग्नामध्ये हिप-हॉप साँग्जनंतर संस्कृत भाषेत श्लोक आणि भक्तीगीते गायली जाणार आहेत. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा लग्नसमारंभ १२ जुलै ते १४ जुलै या दरम्यान होणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नसंमारंभाची रंगत वाढवण्यासाठी प्रसिद्ध बॉलिवूड गायकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये अरिजित सिंग (Arijit Singh) ते सोनु निगम (Sonu Nigam), हरिहरन (Hariharan) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांच्यासारखे दिग्गज गायक अनंत अबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या कार्यक्रमात त्यांच्या सुरांची जादू पसरवतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतशी त्यांच्या लग्नासंबंधित प्रत्येक माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका-अनंतच्या लग्नाच्या दिवशी अरिजित सिंग, सोनु निगम, हरिहरन, श्रेया घोषाल, कौशिकी चक्रवर्ती, शंकर महादेवन आणि अजय- अतुलही परफॉर्म करणार असल्याचं कळत आहे. विशेष म्हणजे हे सर्व गायक लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भक्तीगीत आणि संस्कृत श्लोक हे सर्व गायक त्या लग्नामध्ये गाणार आहेत. ही सर्व गाणी संगीतबद्ध करण्याची जबाबदारी अजय-अतुल या संगीत दिग्दर्शक जोडीवर आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा १२ ते १४ जुलै दरम्यान पार पडणार आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत- राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटीसोबतच क्रीडा तसेच बिझनेस क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. या भव्य लग्नाचे कार्ड आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. १२ जुलैला भव्य दिव्य लग्न, १३ जुलैला शुभ आशीर्वाद सोहळा तर १४ जुलैला ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

SCROLL FOR NEXT