Radhika Merchant Grand Entry Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Radhika Merchant Grand Entry: अंबानींच्या नव्या सुनबाईंची प्री- वेडिंगमध्ये ग्रँड एन्ट्री, अनंत- राधिकाने केला जबरदस्त रोमँटिक डान्स

Anant-Radhika Pre Wedding Viral Video: सध्या सोशल मीडियावर राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीचा एक रोमँटिक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या राधिकाच्या ग्रँड एन्ट्रीची जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Radhika Merchant Grand Entry Viral Video

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगची तुफान चर्चा रंगली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग (Anant Ambani And Radhika Merchant Pre-Wedding) इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. (Bollywood)

या प्री-वेडिंग इव्हेंटमधील काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीचा एक रोमँटिक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या राधिकाच्या ग्रँड एन्ट्रीची जोरदार चर्चा होत आहे. (Viral Video)

राधिका- अनंतच्या ग्रँड एन्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या कपलच्या ग्रँड एन्ट्रीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर 'इन्स्टंट बॉलिवूड'ने त्यांचा रोमँटिक ग्रँड एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. प्री- वेडिंग इव्हेंटमध्ये राधिकाने बेच कलरचा लेहेंगा वेअर केला होता. तर अनंतने पेस्टल व्हाईट कुर्ता, जॅकेट आणि पायजमा वेअर केला होता. या कपलने ‘देखा तेनु पहली बार वे’ या गाण्यावर एन्ट्री घेतली आहे. यावेळी एन्ट्री दरम्यान, राधिका भावुक झालेली दिसली. (Radhika Merchant)

व्हिडीओच्या सुरुवातीला, राधिकाच्या एन्ट्रीपूर्वी फटाक्यांची आतिषबाजी होताना दिसतेय. राधिकाच्या या ग्रँड एन्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधले. राधिका मर्चंटसोबत जान्हवी कपूर आणि खुशी कपूरनेही डान्स केला होता. ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातल्या ‘देखा तेनु पहली बार वे’ या रोमँटिक गाण्यावर राधिकाने एन्ट्री घेतली. तिच्या एन्ट्रीवर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि शिट्ट्यांनी तिचे स्वागत केले. दोघांच्याही रोमँटिक अंदाजाचे सोशल मीडियावर कौतुक करीत आहे. (Anant Ambani)

राधिका- अनंतचा प्री- वेडिंगसोहळा १ मार्च ते ३ मार्च दरम्यान गुजरातच्या जामनगरमध्ये रंगला होता. या तीन दिवसीय इव्हेंटमध्ये, कला, क्रीडासह वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्टार्ससह जगभरातील प्रसिद्ध उद्योगपतींनीही सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, करीना कपूर, सैफ अली खानसह अवघं बॉलिवूड या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. एमएस धोनी, सायना नेहवाल, रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या क्रीडा दिग्गजांपासून ते मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, इवांका ट्रम्प आणि ADNOC सीईओ सुलतान अहमद अल-जाबेर यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपर्यंत या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखचं सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT