Anant Ambani and Radhika Merchant wedding Saam TV
मनोरंजन बातम्या

Anant Ambani and Radhika Merchant wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात दीपिका पदुकोणने लावली हजेरी! ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क

Deepika Padukone's Red Anarkali Costs : दीपिकाने अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात परिधान केलेल्या ड्रेसवर सोनेरी नक्षी होती. सध्या या ड्रेसच्या किंमतीमुळे दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आलीये.

Jyoti Shinde

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. या लग्नासाठी देश-विदेशातील तारे-तारकांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडचे स्टारही उपस्थित होते. लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोनही आली होती. तिने लाल रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता, हा लूक एखाद्या ऐतिहासिक राणीपेक्षा कमी नाही.

दीपिकाच्या धमाकेदार एन्ट्रीने सुरुवातीलाच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या अनारकली ड्रेसमध्ये सोनेरी नक्षी देखील होती. यामुळे अभिनेत्रीचा लूक अगदी राजेशाही वाटत होता. दीपिकाच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. सर्वजण तिच्या ड्रेसची चर्चा करत आहेत.

ड्रेसची किंमत किती?

अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेला अनारकली ड्रेस हा तोरानीकडून डिजाईन केला आहे. यावर सोनेरी नक्षी असल्याने त्याची किंमत देखील फार जास्त आहे. या महागड्या ड्रेसच्या किंमतीमुळेच दीपिका चर्चेचा विषय ठरली आहे. दीपिकाच्या अनारकलीची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. अभिनेत्रीने अनंत आणि राधिकाच्या लग्नात तब्बल १ लाख ४५ हजार ५०० रुपये किंमतीचा ड्रेस परिधान केला होता.

दीपिका सध्या गरोदर आहे. त्यामुळे हा ड्रेस परिधान केल्यावर तिने ओढणीने आपलं बेबी बंप कव्हर केलं होतं. राजेशाही थाटात अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण करण्यासाठी गळ्यात सुदंर चोकर परिधान केला होता. या लूकवर दीपिकाने अगदी साधी सिंपल हेअरस्टाइल केली होती. त्यासाठी तिने सिंपल हेअर बन बांधला होता आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा लावला होता. त्यामुळे तिचं रुप आणखी फुलून आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT