Jarann Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jarann: काळी जादू, अंधश्रद्धा आणि विवाहितेचा भूतकाळ उलगडणार लवकरच; 'जारण'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

Jarann Marathi Movie: ‘जारण’च्या थरारक टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असतानाच आता चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Shruti Vilas Kadam

Jarann Marathi Movie: ‘जारण’च्या थरारक टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असतानाच आता चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा भयावह माहोलमध्ये संपन्न झाला. यावेळी अनिल शर्मा, विकास बहल, राज मेहता हे बॅालिवूड दिग्दर्शकही या सोहळ्याला उपस्थित होते.

या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. विवाहित राधा वाड्यात पाऊल ठेवताच सुरू होणाऱ्या अनाकलनीय घटना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. राधाचे भांबावलेले डोळे, वाड्यात घडणाऱ्या रहस्यमय गोष्टी आणि अनिता दातेचा मंत्रोच्चार करताना दिसणारा अवतार हे सगळे दृश्य प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणणारे आहे. ट्रेलरमधून हे स्पष्ट होते, की राधाचा या वाड्याशी धक्कादायक भूतकाळ जोडला आहे. त्यामुळे या वाड्याचे गूढ काय असेल? लहानपणी राधावर झालेल्या जारणाचा हा परिणाम आहे का? यामुळे तिला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल, हे पाहाणे नक्कीच थरारक ठरेल.

दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात, “ ‘जारण’ हा मानवी भावनांची आणि अंधश्रद्धेच्या परिणामांची खोल उकल करणारा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये जरी काही दृश्य गूढ आणि धक्कादायक वाटत असली, तरी या सगळ्याच्या पाठीमागे एक खोल भावनिक गुंतागुंत आहे. अनिता दाते आणि अमृता सुभाष यांचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करेल. हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरेल याची मला खात्री आहे.”

अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ५ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॅालिवूडला ‘भुलभुलैया २’, ‘भुलभुलैया ३’, ‘वेलकम’ यांसारखे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी ‘जारण’च्या निमित्ताने प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT