Shruti Kadam
पारंपरिलुकसाठी गजरा हेअरस्टाईल सर्वोत्तम आहे. कुंकू भरण्यासह ही हेअरस्टाईल अधिक आकर्षक दिसते. ही बनविणे सोपे असून, साडीच्या लुकला पूर्णता देते.
जर तुम्हाला मॉडर्न आणि आरामदायक लुक हवा असेल, तर मेसी पोनीटेल हा उत्तम पर्याय आहे. ही हेअरस्टाईल काही मिनिटांत तयार होते आणि साडीवर देखील छान दिसते.
सोप्या आणि स्टायलिश लुकसाठी पोकर स्ट्रेट हेअर उत्तम आहे. ही हेअरस्टाईल कधीही आउटडेटेड वाटत नाही आणि कोणत्याही साडीवर शोभते.
उन्हाळ्यात केस मोकळे ठेवायचे नसतील, तर साइड ब्रेड हा चांगला पर्याय आहे. गजऱ्याचा वापर करून या हेअरस्टाईलला अधिक आकर्षक बनवू शकता.
साइड पार्टीशनसह ओपन वेवी हेअरस्टाईल साडीवर खूप सुंदर दिसते. ही हेअरस्टाईल तुमच्या लुकला सौंदर्यपूर्ण स्पर्श देते.
सोप्या आणि जलद तयार होणाऱ्या हेअरस्टाईलसाठी हाफ क्लेचर हेअरस्टाईल उत्तम आहे. केस क्लेचरच्या मदतीने टक करून ही हेअरस्टाईल सहज तयार करता येते.
बॉलीवूड स्टाइल स्लीक बन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. एलोवेरा जेल किंवा हेअर स्टीकच्या मदतीने ही हेअरस्टाईल सहज तयार करता येते आणि साडीवर खूपच शोभते.