Amruta Khanvilkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar : अमृतानं सांगितलं 'आलेच मी' लावणी करण्यामागचे खरं कारण, म्हणाली- सई माझी...

Amruta Khanvilkar Reason Behind Aalech Mi Lavani : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने अलिकडेच सई ताम्हणकरच्या 'आलेच मी ' या गाण्यावर भन्नाट लावणी केली होती. या मागचे कारण तिने आता स्पष्ट केले आहे.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar ) तिच्या नृत्यामुळे कायम चर्चेत असते. अलिकडेच तिने सई ताम्हणकरच्या (Sai Tamhankar) 'आलेच मी ' या गाण्यावर भन्नाट लावणी केली होती. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला होता. लावणीतील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले होते. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. मात्र आता अमृताने या व्हिडीओ मागचे खरे कारण सांगितले आहे.

सईच्या "आलेच मी " लावणीवर डान्स करण्यामागचे कारण सांगत अमृता खानविलकर म्हणाली की, "खरंतर इंडस्ट्रीत आपल्या मित्र मंडळीना त्यांचा नवनवीन कामासाठी आम्ही सगळेच शुभेच्छा देतो. सई ही माझी अत्यंत जवळची आणि आवडती कलाकार मैत्रीण आहे. तिने पहिल्यांदा लावणी सादर केली आणि ती कमाल झाली आहे. तिला तिच्या पहिल्या-वहिल्या लावणीला शुभेच्छा देण्यासाठी मी आणि आशिषने हा व्हिडिओ केला आहे."

पुढे अमृता म्हणाली,"दुसरे आणि खास कारण म्हणजे माझे आणि लव फिल्मच जुने नात आहे. अगदी मलंग या माझ्या चित्रपटापासून माझे हे नात आहे. 'देवमाणूस' हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असल्याने अंकुर आणि त्यांचा संपूर्ण टीमला शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ मी केला आहे"

अमृता खानविलकरला तिच्या 'चंद्रा' या लावणीमुळे खूपच लोकप्रियता मिळाली आहे. अलिकडेच तिचे 'चिऊताई चिऊताई दार उघड' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अमृताच्या आगामी प्रोजेक्ट्सची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT