Amol Kolhe Reacted On Chhaava Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amol Kolhe: 'हे आपलं पारंपरिक नृत्य...' अमोल कोल्हेंनी केलं विकी कौशलच्या 'छावा' चं कौतुक

Amol Kolhe Reacted On Chhaava Movie: छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई साहेब या लेझीम नृत्य करताना पाहायला मिळत आहे

Manasvi Choudhary

विकी कौशल आणि रश्मिकाची मुख्य भूमिका असलेला छावा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराझ आणि महाराणी येसूबाई साहेब हे लेझीम नृत्य करताना दिसत आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील नृत्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे अशातच खासदार अमोल कोल्हेंनी छावा चित्रपटाच्या नृत्याला समर्थन दिलं आहे.

नुकताच रिलीज झालेल्या छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई साहेब या लेझीम नृत्य करताना पाहायला मिळत आहे. हे आपलं पारंपरिक नृत्य असुन आपल्या महाराजांचा दैदिप्यमान इतिहास हा हिंदी चित्रपटातून जगासमोर येत असेल तर त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे,यामुळं यापुढं ही आपल्या महाराजांचा इतिहास जगासमोर येत राहील असं म्हणत खासदार कोल्हेंनी छावाला समर्थन दिलं आहे.

केवळ ट्रेलर पाहून चित्रपटात नेमकं काय आहे? याचा पूर्ण अंदाज बांधणं कठीण आहे. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई साहेब या लेझीम नृत्य करताना पाहायला मिळत आहे. हे आपलं पारंपरिक नृत्य आहे आणि या चित्रपटात या नृत्याची पेरणी नेमकी कशा अर्थाने करण्यात आली आहे, या मागचा उद्देश नेमका काय? हे चित्रपट पाहिल्या शिवाय लक्षात येणार नाही.

आम्ही स्वराज्य रक्षक मालिका साकारताना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली होती. तशीच माझी अपेक्षा आहे की छावाच्या संपूर्ण टीम ने ही याची खबरदारी घेतली असेल आणि ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर छोट्या गोष्टीवरून वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नाही, असं मला व्यक्तिगत वाटतं. आपल्या महाराजांचा दैदिप्यमान इतिहास हा हिंदी चित्रपटातून जगासमोर येत असेल तर त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे, यामुळं यापुढं ही आपल्या महाराजांचा इतिहास जगासमोर येत राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT