
Bigg Boss 18 Winner Karanveer Mehra: बिग बॉसच्या १८ व्या सीझनची ट्रॉफी करणवीर मेहराने नावावर केली आहे. ग्रँड फिनालेच्या दिवशी सर्व स्पर्धकांना मागे टाकून करणवीरने शो जिंकला. दरम्यान, आता एका मुलाखतीत करणवीर गंभीर आजाराने ग्रस्त असल्याबद्दल खुलासा केला आहे.
करणवीरने हा आजार होता
अलीकडेच, करणवीरने एका यूट्यूब चॅनलशी झालेल्या विशेष संभाषणात त्याच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. त्याने त्याच्या अभ्यासात कशा अडचणी आल्या आणि अखेर त्याला त्याच्या गंभीर आजाराबद्दल कसे कळले हे त्याने सांगितले. करणवीरला कळले की त्याला डिस्लेक्सिया आहे. या मुलाखतीत त्याने सांगितले की डिस्लेक्सिया झाल्यानंतर त्याच्यासाठी परिस्थिती खूप कठीण झाली होती, परंतु त्याच्या आईने त्याची काळजी घेतली आणि त्याला प्रोत्साहन दिले.
करणवीरने मानले आईचे आभार
करणवीर म्हणाला, 'माझ्या आईने प्रत्येक पावलावर माझ्यासोबत उभे राहून मला आधार दिला. जेव्हा मला अभ्यासात अडचण यायची तेव्हा ती माझ्यासाठी पुस्तके वाचून दाखवायची आणि मला मदत करायची.' करणच्या मते, त्याचे कुटुंब नेहमीच त्याला त्याच्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून देण्यावर लक्ष केंद्रित करत असे, मग ते अभ्यास असो, खेळ असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो. त्याची बहीण अभ्यासात खूप हुशार होती, तर करणला नेहमीच अभ्यास करताना त्रास व्हायचा. नंतर त्याच्या टेस्ट केल्यावर समजले त्याचा मेंदू समजण्यास सक्षम आहे, परंतु त्याला वाचण्यात अडचण येत आहे.
करणवीरने त्याच्या आईसोबत 'तारे जमीन पर' हा चित्रपट पाहिला आणि हा चित्रपट त्याच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरला. तो म्हणाला, "हा चित्रपट पाहिल्यानंतर मला डिस्लेक्सिया म्हणजे काय हे समजले. या चित्रपटाने आम्हाला समजावून सांगितले की ही एक खरी समस्या आहे आणि त्यामुळे आम्हाला या त्रासावर मत करण्याची हिंम्मत मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.