Rajpal Yadav: राजपाल यादवच्या वडिलांचे निधन; २ दिवसांपूर्वी अभिनेत्यालाही मिळाली होती जीवे मारण्याची धमकी

Rajpal Yadav Father passes away: राजपाल यादवच्या वडिलांचे निधन झाले आहे. याच्या दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या होत्या.
Rajpal Yadav
Rajpal YadavSaam Tv
Published On

Rajpal Yadav: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवचे वडील नौरंग यादव यांचे आज दिल्लीत निधन झाले. मागील काही काळापासून त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वडिलांच्या प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजपाल यादव गुरुवारी (२३ जानेवारी) थायलंडहून दिल्लीला परतला. या बातमीनंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.राजपाल यादव हा उत्तर प्रदेशातील शाहजहापूरचा रहिवासी आहे. .राजपाल यादवच्या वडिलांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Rajpal Yadav
Chhaava: 'छावा'च्या ट्रेलरवरून पुणेकर नाराज; मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा!

दरम्यान, बुधवारी अभिनेत्यासह ४ स्टार्सना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. विनोदी कलाकार आणि अभिनेते राजपाल यादव आणि कपिल शर्मा यांना धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. हा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. या दोन स्टार्स व्यतिरिक्त सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा यांनाही धमक्या मिळाल्या असून पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे.

Rajpal Yadav
Sa La Te Sa La Na Te Movie: पत्रकार आणि पर्यावरणप्रेमींच्या नात्याची गोष्ट; 'स ला ते स ला ना ते' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

या घटनेनंतर, राजपाल यादवचा एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये तो, मी अंबोली पोलिस स्टेशन आणि सायबर क्राईम दोघांनाही कळवले आहे. यानंतर मी याबद्दल कोणाशीही बोललो नाही. असे तो म्हणाला. तो पुढे म्हणाला की मी एक अभिनेता आहे आणि मी अभिनय करतो. मी माझ्या कामाद्वारे सर्व वयोगटातील मंडळींचे मनोरंजन मी करतो. या प्रकरणातबद्दल मला कोणतीही माहिती नाही. मला मिळालेली माहिती मी पोलिसांना सांगितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com