Amitabh Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan : मुंबईत पावसाचा हाहाकार; बिग बींच्या बंगल्यातही शिरले पाणी, पाहा व्हायरल VIDEO

Amitabh Bachchan Bungalow Video : मुसळधार पावसामुळे बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात देखील पाणी शिरले आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यात पाणी शिरले आहे.

सोशल मीडियावर प्रतीक्षा बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गेल्याकाही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. ज्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहेत. लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळा-कॉलेज देखील बंद करण्यात आली आहे. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात चक्क बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बंगल्यात पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतल्या 'प्रतीक्षा' बंगल्यात (Pratiksha Bungalow ) पावसामुळे पाणी शिरले आहे. मुंबईत जुहू भागात अमिताभ बच्चन यांचा बंगला आहे. या बंगल्याची मालकीण अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा आहे. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहेत. लोक पावसात अडकलेली पाहायला मिळत आहेत.

'प्रतीक्षा' बंगला

मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी 'शोले' चित्रपटाच्या यशानंतर 'प्रतीक्षा' बंगला खरेदी केला होता. अमिताभ बच्चन यांनी 'प्रतीक्षा' बंगला 1976 मध्ये विकत घेतला होता. या बंगल्याची आता किंमत 50 कोटींहून अधिक आहे. 1975 ला 'शोले' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आजही या चित्रपटाचे लोक दिवाने आहेत.

वर्कफ्रंट

अमिताभ बच्चन यांना चित्रपटांसोबतच 'कौन बनेगा करोडपती' साठी ओळखले जाते. त्यांनी आजवर 'कौन बनेगा करोडपती' या धमाकेदार रिअ‍ॅलिटी शोचे होस्टिंग केले आहे. त्यांची होस्टिंग शैली देखील चाहत्यांना खूप आवडते. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत असतात. 2024 मध्ये रिलीज झालेला 'कल्की 2898 एडी'मध्ये अमिताभ बच्चन एका खास भूमिकेत पाहायला मिळाले. त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक देखील झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earrings Designs: साडीपासून ते लेहेंग्यापर्यंत...; या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत कोणत्याही आऊटफिटसाठी परफेक्ट चॉइस

Raj Thackeray: किल्ल्यांवरील नमो केंद्र फोडून काढू; राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा

Maharashtra Live News Update: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे?

Raj Thackeray: सुट्टी दिली नाही तर बॉसच्या कानाखाली मारा; राज ठाकरे असं का म्हणाले? VIDEO

Ind vs Aus Semi Final: ऑस्ट्रेलियाचा तडाखा, ३३९ धावांचं टार्गेट; भारत फायनल गाठणार का?

SCROLL FOR NEXT