Aly Goni Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Aly Goni Received Death Threats : अली गोनीने खुलासा केला आहे की त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्याने ट्रोलर्सना इशाराही दिला आहे की जर त्यांनी त्याच्या आई, बहीण किंवा प्रेयसी जास्मिन भसीनबद्दल काही सांगितले तर तो ते सहन करणार नाही.

Shruti Vilas Kadam

Aly Goni Received Death Threats : टीव्ही अभिनेता अली गोनी अनेक दिवसांपासून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यामध्ये तो गणपती उत्सवादरम्यान 'गणपती बाप्पा मोरिया' म्हणत नव्हता. त्यानंतर त्याला टीकेचा सहन करावा लागली. त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्याने ट्रोलर्सना इशारा दिला आहे की ते त्याच्या प्रेयसी किंवा कुटुंबाबद्दल काहीही बोलले तर तो सहन करणार नाही.

अली गोनीने 'फिल्मी ज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, 'मला जीवे मारण्याच्या खूप धमक्या येत आहेत. माझा ईमेल धमक्यांनी भरलेला आहे. लोक माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी ट्विट करत आहेत. मी मुस्लिम आहे, म्हणूनच माझ्यावर असे आरोप लावण्यात आले, परंतु असे अनेक हिंदू आहेत जे गणपती आणत नाहीत,मग ते हिंदू नाहीत का?'

'मी तुझी मान...'

यानंतर अलीने ट्रोलर्सना इशारा दिला, 'जर जास्मिनला धमकावणाऱ्या किंवा शिवीगाळ करणाऱ्यांपैकी एकानेही माझ्यासमोर येऊन असे म्हणण्याची हिंमत दाखवली तर, मी देवाची शपथ त्या माणसाची मान कापेन. जर कोणी माझ्या आई, बहिणी किंवा जास्मिनबद्दल बोलले तर मी ते सहन करणार नाही.'

अलीने सांगितले होते की तो 'गणपती बाप्पा मोरया' का म्हणाला नाही!

यापूर्वी अलीने सांगितले होते की तो 'गणपती बाप्पा मोरया' का म्हणाला नाही. या मुलाखतीत त्याने सांगितले होते की तो पहिल्यांदाच गणपती उत्सवात गेला होता आणि त्याला पूजा कशी करावी किंवा काय करावे हे माहित नव्हते. तो त्याच्या विचारांमध्ये हरवला होता. कुराणात लिहिले आहे की प्रत्येक धर्माचा आदर करा, म्हणून अलीही तेच करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT