Allu Arjun Wax Statue In Madame Tussauds Museum In Dubai Instagram
मनोरंजन बातम्या

Telugu Film Industry मध्ये ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं, फक्त Allu Arjun चीच चर्चा, काय आहे कारण?

Allu Arjun Wax Statue: टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुन कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

Chetan Bodke

Allu Arjun Wax Statue In Madame Tussauds Museum In Dubai

नेहमीच आपल्या अभिनयामुळे टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुन कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. ‘पुष्पा’चित्रपटामुळे अभिनेत्याची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ‘पुष्पा’ला मिळालेल्या भरघोस यशानंतर लवकरच चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. अल्लूची प्रसिद्धी फक्त साऊथपुरतीच मर्यादित नाही, तर त्याचे चाहते जगभरात पसरले आहेत. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा अल्लू अर्जून सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

सध्या सोशल मीडियावर अल्लू अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्याची चर्चा सुरु आहे. या वर्ष अखेरीस अल्लू अर्जुनचा दुबईतल्या मादाम तुसादमध्ये मेणाचा पुतळा तयार करण्यात येणार आहे. नुकतच अभिनेत्याने दुबईतील मादाम तुसाँ संग्रहालयाला भेट दिली होती. यावेळी त्याने त्याचा मेणाचा पुतळा सुद्धा पाहिला.

या संग्रहालयाच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ सुद्धा शेअर करण्यात आला. त्यामध्ये तो पुतळ्यासाठी त्याचं मोजमाप सुद्धा देताना दिसला. सोबतच, अभिनेत्याने दुबईतल्या मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये मेणाच्या पुतळ्यासाठी त्याची निवड केल्यामुळे त्याने आनंद व्यक्त केलाय.

“एकप्रकारे, माझ्यासाठी हा एक अतिशय खास अनुभव आहे. कारण लहानपणी जेव्हा मी मादाम तुसाँमध्ये गेलो होतो, तेव्हा मला कधीच वाटले नव्हते की मी मादाम तुसाँमध्ये मेणाच्या रूपात स्वत:ला पाहीन.” अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने दिली आहे.

अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचे तर, तो सध्या ‘पुष्पा: द रुल’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपट आगामी वर्षी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदनाही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

SCROLL FOR NEXT